शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

ऑस्टीन आणि न्यूयॉर्क... नाइट लाइफचं अमेरिकन कल्चर

By admin | Updated: March 1, 2015 15:41 IST

आम्ही राहातो ते ऑस्टिन ही अमेरिकेतल्या दोन नंबरच्या मोठ्या राज्याची, टेक्ससची राजधानी. राज्यातलं चौथ्या क्र मांकाचं मोठं शहर.

संहिता अदिती जोशी, ऑस्टीन, टेक्सस
 
आम्ही राहातो ते ऑस्टिन ही अमेरिकेतल्या दोन नंबरच्या मोठ्या राज्याची, टेक्ससची राजधानी. राज्यातलं चौथ्या क्र मांकाचं मोठं शहर. शहराची मुख्य ओळख आहे ती टेक्सस विद्यापीठाची मोठी, प्रसिद्ध शाखा, सेमिकंडक्टर आणि अन्य तंत्नज्ञान व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात म्हणून. पण नाईटलाईफ संदर्भात ही ओळख तोकडी आहे. ऑस्टिनमध्ये  लाईव्ह म्युझिक मोठ्या प्रमाणावर सुरू असतं. नाईटलाईफसाठी प्रसिध्द आहे तो वेस्ट सिक्स्थ स्ट्रीट. सहाव्या रस्त्याचा पश्‍चिमेकडचा भाग. एका दिशेला चालत जाण्याच्या अंतरावर असणार्‍या विद्यापीठाच्या इमारती, त्यामुळे जवळपास राहणारा तरु ण वर्ग, शहरातली मध्यवर्ती जागा असल्यामुळे व्यापारी वर्गाचा नजीकचा सहवास. सोमवार ते शुक्रवार दामटून काम करायचं आणि शुक्रवार-शनिवार रात्री भरपूर मजा करण्याची संस्कृती अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ऑस्टिनच्या सहाव्या रस्त्यावर नाईटलाईफची काही दशकांची  ऐतिहासिक  परंपरा आहे.
सुटीच्या आदल्या संध्याकाळी सहाव्या रस्त्यावर दिसणारं चित्र ऋतूनुसार बदलत नाही. लोकांचे कपडे हवेनुसार थोडे बदलतात तेवढंच. सहाव्या रस्त्याच्या  हॅपनिंग  भागाच्या एका टोकाला काँग्रेस अँव्हेन्यू आहे. तिथून आत शिरलं की नाकात आधी सिग्रेटचा धूर जातो. त्यापुढे ‘अमेरिकेत गर्दी नाही’ वगैरे भ्रम दूर व्हायला लागतात. शुक्रवार-शनिवारच्या संध्याकाळी सहाव्या रस्त्यावर सरळ रेषेत चालता येत नाही. कोणीतरी मित्रांची वाट बघत बाहेर उभे असतात, कोणीतरी एखाद्या बारमध्ये शिरण्यासाठी आयडी कार्ड आणलेलं नसतं म्हणून हुज्जत घालत बसलेले असतात (ठराविक बारमध्ये शिरण्याआधी वय बघतात, दारू प्यायची असेल आणि चेहेर्‍यावरून वय कमी वाटत असेल तर ओळखपत्न विचारलं जातं), कोणी गरीब माणूस चौकात एखादा कोपरा पकडून गिटार, माऊथ ऑर्गन वाजवत पाच-दहा नाणी मिळण्याची वाट बघत असतो, कोणाचं तंद्रीतच गाणं-बजावणं सुरू असतं. एका वेळेला चार माणसं एकमेकांशेजारून सहज चालू शकतील असे रुंद फुटपाथ या सगळ्या गर्दी, गलका, पार्टीच्या वातावरणात धुंद-कुंद भरून गेलेले असतात. आपल्या शेजारून चालणार्‍या माणसाशी बोलायचं तर आधी सिग्रेटचा धूर नाकातोंडात जातो, त्याची सवय झाली की मोठ्याने बोलण्याची आठवण होते. रस्त्याने जाताना आजूबाजूच्या बारमधून वेगवेगळं संगीत कानावर पडत असतं.
या सगळ्या गोंगाट, धुराचा त्रास होतो म्हणून आपण कारमध्ये बसावं आणि  फिरावं म्हणावं तर तशीही सोय आहे. 
या नाईटलाईफमध्ये खरं नियंत्रण असतं ते भर रात्री (आणि नेहमीच) गाड्या चालवण्यावर. दारू पिऊन गाडी चालवणं म्हणजे मृत्युला - आपल्या किंवा इतरांच्या - आमंत्रण हे अनेक उदाहरणांमधून वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. आपल्याकडे सलमान खानची केस प्रसिद्ध आहेच; ऑस्टिनमध्येही अशा घटना घडल्याच्या बातम्या कधीमधी येतात. असे प्रकार होऊ नयेत म्हणून शुक्रवार-शनिवारी रात्नी जादा बसफेर्‍या आणि ट्रेनच्या फेर्‍या सोडणे, दारू पिऊन गाडी चालवू नका अशा प्रकारच्या जाहिराती टीव्हीवर, बारमध्ये दाखवणे, असे उपक्र म सरकारकडून होतात. दारु प्यायली असेल तर बारमधून घरी जाण्यासाठी टॅक्सी, आपली गाडी चालवण्यासाठी तात्पुरता ड्रायव्हर अशा सुविधा फोन करून मिळवता येतात, त्यांच्या जाहिराती बारमध्येही सहज दिसतील अशा असतात.
न्यूयॉर्क शहराचा टाईम्स स्क्वेअर म्हणजे तर नाईटलाईफची रंगीन जत्राच! तिथे सदैव काही ना काही सुरू असतं. शहराचा हा भाग कधीच झोपत नाही म्हणतात. एकदा रात्नी तिथे भटकून आम्ही आमच्या हॉटेलात परत येत होतो. गुन्हेगारी जरा जास्त आहे अशा ब्रूकलीन भागात ते हॉटेल होतं. ट्रेनमध्ये एकाने गप्पा छाटायला सुरूवात केली. तुम्ही कोण, आम्ही कोण झाल्यावर टाईम्स स्क्वेअरचा विषय निघाला. न्यू यॉर्कमध्येच राहणार्‍या या माणसाची टाईम्स स्क्वेअरबद्दल तक्र ार होती. ‘हे एवढे मोठे चकचकते जाहिरातींचे फलक कोणी लावतं का? कोणाच्या डोक्यातून आली ही सैतानी कल्पना’ अशी त्याची कैफीयत होती. ‘एवढे लाईट्स बघून झोप नाही लागत लवकर’, हा त्याचा सूर होता. हाच टाईम्स स्क्वेअर  स्वच्छ  करण्यासाठी एकेकाळी न्यूयॉर्क महानगरपालिकेला तारेवरची कसरत करावी लागली होती.
अमेरिकन शहरांमधल्या नाईटलाईफच्या या वर्णनांपेक्षा महत्त्वाची आहे ती संस्कृती. दारू प्यायलेली असो वा नसो, आपल्या वर्तनाचा इतरांना त्नास होऊ नये याची काळजी घेणं सुसंस्कृतपणाचं लक्षण असल्याचं लहानपणापासून, शाळेतच शिकवलं जातं. दारू चढल्यावरही दुसर्‍या माणसाचा आपल्याला धक्का लागला तरी आपण  सॉरी  म्हणावं (दुसरा सॉरी म्हणतोच) हा प्रकार सर्रास दिसतो. दारू पिणं म्हणजे काहीतरी र्मदानगी, अरेरावी करण्यामुळे आपली समाजातली पत वाढते असं मानणारी, असं वागणारी माणसं मला दिसलेली नाहीत. दारू प्यायलेल्या, तोकडे कपडे घालून मैत्रिणींबरोबर जाणार्‍या मुलींनाही असुरिक्षत वाटेल अशी हवा तिथे दिसली नाही.
म्हणजे सगळंच आलबेल आहे का?- नाही. जिथे दारू आहे तिथे काही अंशी अगदी ड्रग्जपासून छोटेमोठे गुन्हे होतातच. पण त्यांचं प्रमाण अगदी कमी हे एक आणि असे गुन्हे झाल्यावर, शारीरिक दुर्घटना झाली तरीही तातडीने उपचार मिळण्याची सगळी सोय आहे. ९११ नंबर डायल केल्यानंतर दोन-चार मिनिटांमध्ये सहाव्या रस्त्यावर, जोरदार पाटर्य़ा सुरू असतानाही मदत मिळते. बरेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत; मध्यंतरी दोन माणसांची मारामारी होऊन त्यात एक माणूस दगावला. ड्रग्जसंबंधी काही घटना होती. पण गुन्हेगार कोण हे सीसीटीव्हीमध्ये दिसलं, आठवड्याभरात तो माणूस पकडलाही गेला. अमेरिकेच्या महानगरांमध्ये साधारणत: दिसणारी ही शिस्त, संस्कृती कायद्याच्या, सीसीटीव्हीच्या भीतीपोटी आलेली आहे का? कदाचित नाही. अनेक लोक आनंदाने वाहतुकीचे नियम पाळताना दिसतात, आपल्या आनंदाचा इतरांना त्रास होऊ नये याचाही विचार करतात. एका रोड ट्रिपसाठी बाहेर पडलो होतो ते शनिवारी लवकरच पोहोचलो टेनसी राज्यातल्या नॅशव्हीलमध्ये. तिथल्या  सहाव्या रस्त्यावर पोहोचलो. सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर अजिबातच गर्दी नव्हती; कागद, प्लास्टिकचे क्वचित काही कपटे दिसले असतील तेवढेच. काल रात्नी इथे नॅशव्हिलमधले तरुण पार्टी करत होते यावर कोणाचा विश्‍वासही बसू नये!