युद्धात केव्हाही काहीही यघडू शकते

By Admin | Updated: August 16, 2014 22:08 IST2014-08-16T22:08:19+5:302014-08-16T22:08:19+5:30

एका धोब्याने जो सैनिकही नाही, त्याने कर्तव्यदक्षता आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून अधिका:याचे प्राण वाचविणो हे खरोखरच धाडसाचे आणि कौतुकाचे काम आहे. म्हणून रामचंदरला शौर्याचा परमवीरचक्रानंतरचा दुस:या नंबरचा महावीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युद्धातील असेच काही अद्भुतरम्य असे प्रसंग.

Anything can happen in the war anytime | युद्धात केव्हाही काहीही यघडू शकते

युद्धात केव्हाही काहीही यघडू शकते

>- विनायक तांबेकर
 
'युद्धस्य कथा रम्य:,’ असे आपण वाचले आहे; परंतु युद्धस्य कथा केवळ मनोरंजक नसून, आश्चर्यकारक आणि ब:याच वेळा मन विषण्ण किंवा दु:खी करणा:या असतात. अगदी ताजी घटना म्हणजे काश्मीर सरहद्दीवर गस्त घालणा:या आपल्या जवानाला पाकिस्तानी सैनिकांनी केवळ ठार मारले नाही, तर त्याचे मुंडके कापून नेले. अशा घटना चीड आणणा:या आणि मनाला विषण्ण करणा:या असतात. 
1965च्या भारत-पाक युद्धातील माझा स्वत:चा अनुभव फार वेगळा होता. आमच्या युनिटच्या शेजारी पायदळाची बटालियन होती. त्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर ले. कर्नल गुरुदयाल सिंग होते. पलीकडच्या पाकिस्तानी सरहद्दीवर पाक सैनिक होते. पाक आणि आपल्या ठाण्यांच्या मधला प्रदेश No Man's Land म्हणजेच कुणाच्याही मालकीचा नसतो. त्यामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी पाकिस्तानी सैनिक पिण्यास आणि आंघोळीस वापरत. युद्धात शत्रू हा शत्रू असतो. त्याला या ना त्या प्रकाराने जेरीस आणावेच लागते. तिथे नेहमीच नियम व भूतदयेचे निकष लावून चालत नाही. कर्नल गुरुदयाल सिंगला तो वापर बंद करायचा होता; जेणोकरून पाक सैनिकांना दुसरीकडून पाणी आणावे लागले असते; परंतु युद्धबंदी (सीझ फायर) झाल्यामुळे पाक सैनिकांवर गोळीबार करणो शक्य नव्हते. दुसरा उपाय काढण्यासाठी कमांडिंग ऑफिसरने त्यांच्या अधिका:यांची बैठक घेतली. त्याच विहिरीवर पाणी घेण्यासाठी आलेल्या पाक सैनिकांवर गोळीबार करण्याचाच उपाय सर्वानी सुचविला; परंतु ते नियमानुसार शक्य नव्हते. यावर अनुभवी कर्नल गुरुदयाल सिंग यांनी एक उपाय सुचविला. त्यांनी सांगितले, ‘‘त्या विहिरीत एखादा प्राणी मरून पडला तर पाकिस्तानी ते पाणी वापरू शकणार नाहीत!’’ बटालियनभोवती फिरणा:या भटक्या कुत्र्यांपैकी एकावर आफत ओढवली, गुरुदयाल यांनी एका ऑफिसरला ती जबाबदारी दिली. हे काम दिवसा करणो शक्य नव्हते. कारण, तो नो मॅन्स लॅँडमध्ये गेल्यास पाक सैनिक गोळीबार करतील. म्हणून हे अवघड काम रात्रीच करावे लागणार होते. त्याप्रमाणो तो ऑफिसर रात्री विहिरीकडे मेलेल्या कुत्र्याला घेऊन निघाला; परंतु पाकिस्तान्यांना चाहूल लागल्याने त्यांनी गोळीबार केला. अधिकारी कुत्र्यासह परत आला. मिशय अनसक्सेसफुल! दुस:या रात्री दुस:या ऑफिसरला ‘मिशन’वर पाठविले. त्याच्यावरही गोळीबार झाला. तो परत आला. कमांडिंग ऑफिसर गुरुदयाल सिंग चिडले. त्यांनी ऑफिसर्सना चांगलेच झाडले आणि म्हणाले, ‘‘आज रात्री पाहा, मी स्वत: कुत्र्याला नेऊन टाकतो.’’ त्या रात्री 11 वाजता सर्व बटालियन जागी होती. कर्नल गुरुदयाल यांनी रात्री 12 विहिरीकडे प्रयाण केले. सर्वानी श्वास रोखून धरला होता. जर पाकिस्तानने फायरिंग केले तर? सुमारे दोन तासांनी कर्नल गुरुदयाल सिंग परत आले. त्यांचा सर्व युनिफॉर्म मातीने माखला होता. क्रॉसिंग-सरपटत केल्याने दोन्ही ढोपरे फुटली होती. हाताची माती झटकत गुरुदयालने सांगितले, मिशन फत्ते! 
दुस:या दिवशी गुरुदयाल आणि त्यांच्या अधिका:यांनी विहिरीकडे सतत लक्ष ठेवले. पाकिस्तानी सैनिक विहिरीकडे येत. आत बघत आणि पाणी न घेताच जात होते! त्यांची एका बाजूने कोंडी करण्यात यश आले होते. 
महावीरचक्र मिळविणारा धोबी-रामचंदर!
युद्धात शत्रूशी लढताना दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल परमवीरचक्र, त्यानंतर महावीरचक्र, वीरचक्र असे पुरस्कार दिले जातात; परंतु लढाईत एका धोब्याने-परटाने महावीरचक्र मिळविल्याचे सांगितले, तर कुणाचाच त्यावर विश्वास बसणार नाही; परंतु हे सत्य आहे. पूर्वी आर्मीच्या बटालियनमध्ये जवानांचे, अधिका:यांचे युनिफॉर्म धुण्यासाठी धोबी, लंगर (किचन) मध्ये स्वयंपाक करण्यासाठी कुक्स (आचारी), बूट किंवा चमडय़ांच्या वस्तू दुरुस्ती करण्यासाठी मोची (चांभार) असत. त्यांची भरती त्या वेळी Non Combatant म्हणजेच असैनिक म्हणून होत असे. मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप म्हणजेच एम.ई.जी. किंवा मद्रास सॅपर्स यांमध्ये 14 फिल्ड कंपनीमध्ये रामचंदर नावाचा धोबी होता. ही घटना डिसेंबर 1947 मधली म्हणजे स्वातंत्र्यानंतर 4 महिन्यांनंतरची. या फिल्ड कंपनीच्या कॉनव्हायमध्ये Lt. FDW Fallon (फॉलन) हा ब्रिटिश अधिकारी होता. ही फिल्ड कंपनी जम्मूच्या दिशेने कॉनव्हायमधून जात होती. जम्मूच्या अलीकडे पुलावरचे डेकिंग (पृष्ठभाग) काढून टाकण्यात आले होते. शत्रूने तो रोड मुद्दाम ब्लॉक केला होता. रामचंदरने गाडीतून उतरून पुलावर डेकिंग-फळ्या टाकण्यास सुरुवात केली. या फायरिंगमध्ये लेफ्टनंट फॉलन गंभीर जखमी झाला. रामचंदरने रायफल उचलून शत्रूवर गोळीबार करीत फॉलनची गाडी पुलापलीकडे नेली; परंतु शत्रूच्या गोळीबारापुढे त्याला गाडी सोडून द्यावी लागली आणि तोवर इतर गाडय़ा पुढे गेल्या होत्या. मागे राहिले ते  जखमी झालेले लेफ्टनंट फॉलन आणि रामचंदर. रामचंदरने बेशुद्ध पडलेल्या फॉलनला खांद्यावरून कसेबसे 8 मैलांवर असलेल्या आपल्या सैन्याच्या ठाण्यावर नेले आणि तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जो सैनिकही नाही, अशा एका धोब्याने त्याने इतकी कर्तव्यदक्षता आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून अधिका:याचे प्राण वाचविणो, हे खरोखरच धाडसाचे आणि कौतुकाचे काम होते. म्हणून रामचंदरला शौर्याचा परमवीरचक्रानंतरचा दुस:या नंबरचा महावीरचक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एका सिव्हिलीयनला महावीरचक्र मिळणो, ही खरोखरच असामान्य, महान घटना आहे. मद्रास सॅपर्सच्या 200 वर्षाच्या इतिहासात धोब्याने महावीरचक्र मिळवल्याची, ही एकमेव घटना आहे. म्हणूनच म्हणतात युद्धात काहीही घडू शकते.
(लेखक निवृत्त कर्नल आहेत़)

Web Title: Anything can happen in the war anytime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.