..सारे त्रंगडे झाले आहे!
By Admin | Updated: August 29, 2015 14:43 IST2015-08-29T14:43:33+5:302015-08-29T14:43:33+5:30
समाजापेक्षा व्यक्तिगत जीवनाकडे ओढा वाढल्याने ‘आपण आणि आपले’ अशी स्वकेंद्रितता वाढीस लागली. अभ्यास, संशोधन करून काही लिहावे ही जाणीवच संपली. वाचन केले पाहिजे, त्यामुळे प्रगल्भता येते, चतुरस्रता निर्माण होते यालाच छेद गेला. वाचनाची आवश्यकताच वाटत नसणारी पिढीच्या पिढी पुढे येऊ लागली.

..सारे त्रंगडे झाले आहे!
>विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यामागे आपली भूमिका काय?
- भारताबाहेरील मराठी लोकांनी केलेल्या मागणीमुळे हे संमेलन घडून येते. यंदा जरी ते भारतातच अंदमान इथे असले, तरी मराठी नसलेल्या भागात होते आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणतीही निवडणूक नाही हा अत्यंत महत्त्वाचा भाग. शिवाय, ज्या ठिकाणी हे संमेलन होते आहे ती सावरकरांशी संबंधित भूमी आहे. मी सावरकरांच्या साहित्याचा, विचारांचा एक अभ्यासक आहे. त्यामुळे माङो नाव या अध्यक्षपदासाठी पुढे आले. बाहेर जाऊन आपले विचार, चिंतन मांडता येत असल्याचा मलाही आनंद आहे. महाराष्ट्राबाहेर मराठी विषयाच्या संबंधाने साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चर्चा, व्याख्याने, चिंतनाची देवाण-घेवाण होत असल्याचा आणि ते मराठीसाठी पोषक असल्याचा आनंद सर्वानीच मानायला हवा. हे काम गेल्या तीन संमेलनांत घडते आहे. लोक एका विचाराने एकत्र येताहेत म्हणूनही मी अध्यक्षपदाचा स्वीकार केला.
याबाबतची माझी आणखी एक भूमिका स्पष्ट करायला हवी की मी काही कथा, कादंबरी, नाटक असे ललित लेखन करणारा माणूस नव्हे. माङो लेखन हे वैचारिक आणि अभ्यासाच्या मार्गाने जाणारे आहे. त्यामुळे लोक मला साहित्यिक मानतात की मानत नाहीत हाही प्रश्न आहे. दुसरे म्हणजे, दहावीनंतर माझा मराठी साहित्याचा अकॅडमिक अभ्यास नाही. मी कायदा आणि अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. राजकीय आणि सामाजिक विषय हे माङो अभ्यासविषय आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असणारा बुद्धिवाद मला कायमच आकर्षित करीत आला आहे. त्यांच्या नावाशी निगडित संमेलन हा एक महत्त्वाचा योग असल्याने आणि साहित्य महामंडळाच्या लोकांना त्याबद्दलचा माझा विचार महत्त्वाचा वाटल्याने मी चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. यात स्वत:चा खर्च स्वत: करायचा असून, कोणतेही शासकीय अनुदान, रागलोभ, मतांचे राजकारण नाही हीदेखील एक चांगली बाब आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे साहित्य आणि आजचा समाज यांची कशी सांगड घालता येईल?
- सावरकर हे द्रष्टे महापुरुष होते. त्यांच्या लेखनाचे मी दोन भाग करतो. त्यात पहिला भाग त्यांच्या ललित साहित्याचा की ज्यात कथा, कादंबरी, नाटक, काव्य हे साहित्यप्रकार येतात. दुसरा भाग त्यांच्या वैचारिक साहित्याचा आहे, त्यात त्यांनी मांडलेले विचार हे आजही अत्यंत स्फोटक आहेत. पण माणूस मेल्यावर सोयीसोयीने त्याच्या विचारांचा अर्थ लावत त्याला वळचणीला टाकण्याचे प्रकार आपल्याकडे चालतात. सावरकरांच्या बाबतीतही तेच घडले. त्यांच्या विरोधकांनी खरे सावरकर पोहोचूच दिले नाहीत. मी महाविद्यालयीन जीवनापासून सावरकरांच्या साहित्याकडे ओढला गेलो तो त्यांच्या प्रखर बुद्धिवाद आणि विज्ञान निष्ठेमुळे. त्यांच्या बुद्धिवादाची चिकित्सा झालीच नाही. ‘धर्मग्रंथ हे कालबाह्य झाले आहेत’ असे स्वच्छपणो सांगताना त्यात त्यांनी वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण यांचाही उल्लेख केला आहे. वेद हे पाच हजार वर्षाची परंपरा म्हणून आपण सांगत असू तर आपण पाच हजार वर्षे मागास आहोत असे समजा असे ते म्हणाले आहेत. रोजच्या जगण्यातली वागणूक, आपला दृष्टिकोन यावर धर्म आधारित असल्याचे ते म्हणतात. इहलोकात काय आणि कसे वागायचे हे समाज ठरवेल तोच धर्म असे त्यांनी निक्षून सांगितले आहे. त्यांच्या या आणि अशा विचारांची समाजाला आज खरोखरच गरज आहे.
सावरकरांनी एकूण सात प्रकारच्या बंदी म्हणजे बेडय़ा तोडण्याचे आवाहन केले होते. त्यात (1) परकीय बंदी, (2) स्पर्श बंदी, (3) व्यवसाय बंदी, (4) रोटी बंदी, (5) वेदोक्त बंदी, (6) सिंधू बंदी, (7) बेटी बंदी या त्या बंदी आहेत. यापैकी काही बेडय़ा आपण नक्कीच तोडल्या पण काही अद्यापही आहेत. त्यातून बाहेर पडण्याचे आव्हान आजच्या समाजासमोर आहे. त्यासाठी सावरकर मार्गदर्शक ठरतात. त्यांचा राष्ट्रविचार, बुद्धिप्रामाण्यवाद, समाजक्रांतीचे चिंतन आणि विज्ञाननिष्ठा आपल्याला आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. 1924 ते 193क् सालात त्यांनी हे विचार मांडले, त्याचे प्रतिपादन केले. पुढे जाण्यासाठी, आधुनिकतेकडे ङोपावण्यासाठी आजही सावरकर मार्गदर्शक ठरतात.
साहित्यातला विचार किंवा वैचारिक साहित्याची परंपरा आज आपल्याकडे खंडित होताना दिसते, याचे कारण काय?
‘परंपरा’ खंडित झाली आहे असे ढोबळमानाने म्हणून चालणार नाही. त्या परंपरेचे सूक्ष्म अवलोकनही केले पाहिजे. आपल्याकडे चाणक्य - अर्थशा, पाणिनी - व्याकरणशास्त्र, पतंजली - योगशास्त्र यांचे कार्य आणि ग्रंथ पुढे आल्यानंतर विचार परंपरा खंडित झाल्याचे दिसते. या महनीयांनंतर इंग्रज येईर्पयतचा जो मोठा मधला काळ आहे त्यात वैचारिक साहित्य किती आणि काय निर्माण झाले? जी निर्मिती झाली ती सगळी अध्यात्म, काव्य, पांडित्य, पारलौकिक जीवन, मनोरंजन या प्रकारात मोडणारी आहे. इंग्रज आल्यावर विचारवंतांची वैचारिक लेखनाची एक मोठी फळीच आपल्याकडे तयार झाली. त्यात लोकहितवादी, आगरकर, चिपळूणकर, टिळक, सावरकर, आंबेडकर हे सगळे येतात. अगदी 196क् र्पयत आपल्याकडे हे विचारवैभव होते, त्यानंतर पुन्हा त्याला उतरती कळा लागली. डॉक्टर, इंजिनिअर होण्याकडे मुलांचा ओढा वाढला. नव्या पिढीत लक्ष्मीपुत्र होण्याची आस निर्माण झाली. सरस्वतीपुत्र होण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही. त्यामुळे त्याग गेला, विचार गेला. परिणामी वैचारिक साहित्य मागे पडले. कला शाखेला विद्यार्थी नाही, विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन काही दिवस इथे प्रॅक्टिस करून पुढे परदेशात जाण्यास नवी पिढी उत्सुक झाली. त्यामुळे आपल्याकडची विचार आणि वैचारिक साहित्याची परंपरा खंडित झाल्यासारखी वाटते.
सध्या साहित्य व्यवहारात मूल्यांपेक्षा खोटय़ा प्रतिष्ठेला किंमत आली आहे. असे का झाले?
- साहित्य व्यवहार हा एका दुष्टचक्रात अडकल्यासारखा झाला आहे, हे खरे आहे. यामागे वेगवेगळी कारणो आहेत. समाजापेक्षा व्यक्तिगत जीवनाकडे ओढा वाढल्याने आपण आणि आपले, स्वकेंद्रितता असे प्रकार वाढीस लागले. त्यामुळे अभ्यास, संशोधन करून काही लिहावे ही जाणीवच संपली. वाचन केले पाहिजे, त्यामुळे प्रगल्भता येते, चतुरस्रता निर्माण होते यालाच छेद गेला. वाचनाची आवश्यकताच वाटत नसणारी पिढीच्या पिढी पुढे येऊ लागली. त्यामुळे मूल्याधिष्ठित समाजरचनेलाही धक्के बसले. त्यातला दुसरा भाग म्हणजे एखाद्या विषयाला वाहून घेत पाच-पाच दहा-दहा वर्षे एखादा ग्रंथ लिहिण्यासाठी लागणारा वेळ लोक आता देईनासे झाले आहेत. बरे, समजा असा वेळ दिला, तरी त्या ग्रंथाच्या एक हजार प्रती विकायला लागणारा काळ हा जवळपास दहा वर्षाचा असतो. असे असल्याने फास्ट फूडची लागण आपल्या साहित्य व्यवहारालाही झाली. याच तुलनेत परदेशात मात्र पुस्तकांच्या लाखोनी प्रती निघतात, त्या हातोहात खपतात, त्यांचे खपाचे विक्रम होतात हे नेमके काय आहे हे जाणून घेतले पाहिजे.
आपल्याकडे आज धार्मिक पुस्तकांची विक्री सर्वात जास्त होते. त्याखालोखाल व्यक्तिमत्त्व विकास, आहारशास्त्र, आरोग्य असा क्रम लागतो. त्यानंतर कथा, कादंबरी, कविता येते. वैचारिक, चिकित्सा यांचा क्रम कितवा? हा मोठा प्रश्न आहे. असे सगळे त्रंगडे झाल्याने मी सुरुवातीला म्हणालो तसे आपण आणि आपला साहित्य व्यवहार एका दुष्टचक्रातच सापडलेला आहे, याची जाणीव तीव्र होईल, तेव्हाच मूल्यांचा विचार पुन्हा करता येईल.
सध्या आपण सामाजिक दुभंगलेपण अनुभवतो आहोत. याचे कारण काय?
- दुभंगलेपण म्हणजे काय हे आधी आपण समजून घ्यायला हवे. ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर त्यांनी आपल्याकडची संस्थाने खालसा करायला सुरुवात केली. तोर्पयत जवळजवळ बाराशे ते तेराशे संस्थाने आपल्याकडे होती. प्रत्येकाचे राज्य वेगळे, कायदे वेगळे. इंग्रज आल्यानंतर एकत्वाची भावना आपल्याकडे निर्माण होऊ लागली. त्यामुळे हे एकत्व हा नवा विचार आहे, आधुनिक आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. जातिव्यवस्था हादेखील आपल्याकडचा जुना भाग आहे. राष्ट्र, धर्म, भाषा यापेक्षाही जातीचा अभिमान हा कायमच मोठा राहत आला आहे. अलीकडच्या काळात राजकीय फायद्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला, म्हणून काहीसे दुभंगलेपण आपल्याला जाणवत असेल. पण पन्नास वर्षापूर्वी आपण जसे होतो तसे आज नाही. तो कठीण काळ आज नाही. अशी दृष्टीतली सकारात्मकता आपण ठेवली पाहिजे. भावकी आणि सोयरे यांचा गट म्हणजे जात असते असे माङो म्हणणो आहे. लोकशाहीचा अपरिहार्य परिणाम कोणता असे विचारले तर जातीचे राजकारण हे त्याचे सरळ उत्तर सांगता येते. त्यामुळे दुभंगलेपणाची भावना निर्माण होते आहे असे मला वाटत नाही. एकत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचा विचार आपण जर प्रकर्षाने करू लागलो तर ती आनंदाची गोष्ट आहे.
मुलाखत : स्वानंद बेदरकर
swanand.bedarkar@gmail.com