शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

All I Want To Say is...

By admin | Updated: September 9, 2016 16:47 IST

सतत काहीतरी भरजरी सुप्रसिद्ध जुने आणि महत्त्वाचे ऐकण्यापेक्षा थोडे ओधडबोधड का असेना, आज तयार होणारे ताजे संगीत ऐकावे. नाहीतर तुम्ही मरणाच्या आधीच मनाने मेलेले राहाल.

- सचिन कुंडलकर

कोणत्याही चिरंतन मूल्यव्यवस्थेविषयी मला फारसे आकर्षण उरलेले नाही. एखादी गोष्ट केवळ खूप वर्षे टिकून आहे म्हणून मी त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊच शकत नाही. सतत बदलणाऱ्या जगामध्ये मी बदलत बसलो आहे. स्थैर्य आणि सातत्य मिळाले असते तर मलाही फार आवडले असते; पण दर क्षणाला आमच्या समोर जग बदलत गेले आहे. मी ज्या संगीताने स्वत:चे पोषण करतो, ते संगीतही त्याच स्वरूपाचे आहे. 

(मागील रविवारपासून पुढे...)
मी स्वभावानुसार गर्दीत फिरणारा माणूस नाही. मी गर्दीला घाबरणारा प्राणी आहे. जास्त खासगी स्वभावाचा आहे. आनंद साजरा करायची माझी कल्पना तीन ते चार जवळच्या लोकांसोबत असण्याची असते. हजारो लोक जमतात तिथे जाऊन गर्दीचा भाग व्हायला मी थोडा बिचकतो. या सगळ्याचा परिणाम मी संगीत कसे आणि कोणते ऐकतो यावर होत असतो. मी संगीत ऐकतो ते मोजके जाणकार लोक असलेल्या खासगी मैफिलींमध्ये किंवा हेडफोनवर! अनावश्यक गर्दीमध्ये संगीताचा अनुभव विसविशीत आणि विस्कळीत होऊन जातो. दुसऱ्या बाजूला डेविड ग्वेत्ता किंवा स्क्रीलेक्स सारख्या इडीएमच्या (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) कॉन्सर्टना म्युझिकचा अनुभव हजारो लोकांसोबत एका ऊर्जेच्या पातळीवर जाऊन घेण्यात मजा असते. मी खूप लहान वयापासून चित्रपट क्षेत्रात असल्याने मला आता गर्दीतला प्रेक्षक होणे शक्य होत नाही. किंबहुना प्रेक्षक होणेच शक्य होत नाही कारण तुम्ही काम करताना सतत मानसिक पातळीवर प्रेक्षकांच्या समोर उभे राहत असता. वर्षानुवर्षे प्रेक्षकांकडे एक न उलगडणारे कोडे म्हणून पाहत असता. काही वर्षांनी मग आपण साधे प्रेक्षक होऊन गर्दीचा भाग होऊन जाणे खूप अवघड बनते. गर्दी आणि सुसंकृत माणसांचा समूह यातला फरक कळू लागतो. - ही माझी जगाकडे बघण्याची जी पूर्वग्रहदूषित दृष्टी तयार झाली आहे त्या दृष्टीने मी किंवा प्रत्येक संगीताचा चाहता आपापले संगीत आणि ते ऐकायची पद्धत निवडत असतो. पूर्वग्रहाचा (प्रेज्युडाइस) हा एक महत्त्वाचा फायदा असतो. तुमची कलात्मक आवड-निवड ही तुम्ही पूर्वग्रहदूषित (हेवीली प्रेज्युडाइस) असलात की जास्त उत्तम घडते. अतिसरळ आणि सपक अशा तर्कशुद्ध मनाच्या आणि सद्सदविवेकबुद्धी सतत फुलआॅन मोडवर ठेवून वागणाऱ्या माणसांना कलेचा संपूर्ण आनंद कधीही घेता येत नाही. त्यांच्या डोक्यात कोणतेही अधलेमधले नाजूक आनंद शिरू शकत नाहीत कारण त्यांच्या मनात द्वेष, स्पर्धा, नाराजी यांच्यासारखे आवश्यक बॅक्टेरिया तयारच झालेले नसतात. लेखक हा जसा बहुभाषिक असतो तसाच तो मनाच्या पातळीवर बहुलैंगिक असतो. मी लिहिण्याचे काम करताना, कथा रचत असताना नकळतपणे माझे मन संपूर्ण पुरुषाचे असते किंवा संपूर्ण स्त्रीचे असते. ते वारंवार रंग बदलत राहते. काहीवेळा ते या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या विस्तृत समुद्रामध्ये काही हे आणि काही ते बनून तरंगत राहते. मी म्युझिकची निवड करतो तेव्हा माझ्याही नकळत माझी त्यावेळची मन:स्थिती माझ्या वतीने निर्णय घेत असते. मला काय आवडते यापेक्षा माझे मन कोणत्या प्रकारच्या म्युझिकला प्रतिसाद द्यायला उत्सुक आहे ही गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची होते.माझ्याकडे काही अतिशय आवडत्या गोष्टी आहेत त्या मी वारंवार ऐकतो. आमीर खानसाहेबांचा मारवा असलेली एक सीडी आहे... लता मंगेशकरांची दोन गाणी आहेत (‘जा रे उड जा रे पंछी’ आणि ‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो’)... एडिथ पियाफ या जुन्या फ्रेंच गायिकेचे एक गाणे आहे (ठी टी द४्र३३ी ढं२)... माधुरी पुरंदरे यांनी गायलेली ग्रेस यांची एक कविता आहे (मी अशी बहरले होते) आणि लता मंगेशकरांच्याच आवाजातले पसायदान आहे. शिवाय मडोनाचे ह्यऊङ्मल्लह्ण३ ू१८ ाङ्म१ ेी अ१ॅील्ल३्रल्लंह्ण हे गाणे आहे. ...या गोष्टी मला ऐकाव्या लागत नाहीत इतक्या त्या माझ्या मनाच्या आतमध्ये जाऊन शांतपणे बसल्या आहेत. माझ्या रक्ताचा भाग बनल्या आहेत. मी वारंवार या गोष्टी मन शांत करून आणि डोळे बंद करून ऐकत राहतो. माझे आतले संगीत काय असे कुणी विचारले तर या त्या चार-सहा गोष्टी आहेत.मी मनाने अगदी संपूर्ण शहरी माणूस आहे. मला लोकसंगीत फारसे आवडत नाही. ते माझ्या आत फारसे उतरत नाही. मला ते आता ऊर्जा देत नाही. ते आवडायला जो भाबडेपणा आणि मनाचा साधेपणा लागतो तो माझ्या आयुष्यातून हळूहळू संपत गेला. त्यामुळे मला भारु डे, पोवाडे, अभंग, ओव्या, आरत्या या सगळ्या साहित्याशी पूर्वी जोडता यायचे तसे आता नाते जोडता येत नाही. हा माझा मोठा तोटा झाला असे मला वाटते. आयुष्यात पुढे जाताना आपला सोपेपणा कधी आणि कसा संपला? बहिणाबार्इंची कविता आता मला भावत नाही याचे कारण ‘माझ्या मनातले नष्ट झालेले लहान मूल’ हे आहे. त्या विहिरीचे पाणी पिऊन माझे पोट भरले आहे. मला सामाजिक संगीताचा मात्र फार मनापासून अगदी कंटाळा आहे. समूहगीते आणि सामाजिक चळवळीची बेसूर आणि भेसूर गाणी मला जांभया आणतात. मी कोणतीही गोष्ट आवडल्याचे खोटे बोलू शकत नाही. उपयोगी कलात्मक वस्तू या नेहमीच कुरूप असतात त्यामुळे सामाजिक कला नावाचे जे खूळ भारतात उगवले आहे ते फार विनोदी आहे. मी अशा वातावरणात मोठा झालो ज्या वातावरणात कोणत्याही चिरंतन मूल्यव्यवस्थेविषयी मला फारसे आकर्षण उरलेले नाही. एखादी गोष्ट केवळ खूप वर्षे टिकून आहे म्हणून मी त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊच शकत नाही. सतत बदलणाऱ्या जगामध्ये मी बदलत बसलो आहे. माझ्या आधीच्या पिढीला मिळाले ते स्थैर्य आणि सातत्य मला मिळाले असते तर मलाही फार आवडले असते. पण दर क्षणाला आमच्या समोर जग बदलत गेले आहे. आमच्या पिढीला वेगाने बदलणाऱ्या जगाचा अनुभव इतर कोणत्याही पिढीपेक्षा जास्त पचवावा लागला आहे. त्यामुळे मी ज्या संगीताने स्वत:चे पोषण करतो ते संगीतही त्याच स्वरूपाचे आहे. काही मोजके गायक, काही मोजके वादक आणि काही बॅण्ड्स हे त्याला अपवाद ठरले आहेत. कारण ही माणसे काळासोबत बदलत जात अजूनही आश्चर्य निर्माण करायची थांबत नाहीत. त्यातले काही कलाकार आता मेले आहेत. काही जिवंत असले तरी आता नवे काम करत नाहीत. त्यांच्या कामातली ऊर्जा आजच्या काळातही रंग बदलत जिवंत राहिली आहे. रोलिंग स्टोन्स आणि बीटल्स हे दोन बॅण्ड्स... लिओनार्ड कोएन, बॉब डिलन आणि जिम मॉरीसन हे कवी आणि गायक यांच्यापासून माझी ही यादी सुरू होते. भारतामध्ये आशा भोसले यांनी निवडलेली आणि गायलेली गाणी हा सुद्धा बदलत्या काळाला पुरून उरणारा अनुभव आहे. मला त्या फार म्हणजे फारच आवडतात. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड, अमेरिकेत जन्मलेले संगीत पुन्हा जग नष्ट होईपर्यंत साथ देणार आहे. आधार देणार आहे. नवे संगीत हे दु:खातून आणि विध्वंसामधून तयार होते. त्यानंतर अनेक पिढ्या या त्या संगीतावर ऊर्जा मिळवित किंवा त्या संगीताचा अर्थ लावत स्वत:चे नवे संगीत तयार करीत राहतात. मी सध्या ‘कोल्डप्ले’ या तरु ण ब्रिटिश बॅण्डचे संगीत ऐकतो आहे. ते माझ्यासोबत खूप वर्षे टिकेल. ते मला संपूर्ण ओळखीची अशी भाषा बोलतात. मी बाहेर एकटा वणवण करत असताना ते मला समजून घेतात. पिंक फ्लॉइड हा बॅण्ड असाच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यांचे संगीत मनाचा एक आतला स्तर बनून सतत माझ्यासोबत वावरत राहते ...आणि मायकल जॅक्सन माझ्यासाठी कधी संपेल असे वाटत नाही. 
 
All I want so say is that 
they don’t really care about us 
 
हे त्याने मला लहानपणीच सांगून जगायला तयार केले असे मला वाटते. हल्लीचे संगीत आम्हाला अगदी ऐकवत नाही असे म्हणणारी मनाने बुरसटलेली माणसे माझ्या आजूबाजूला इतकी आहेत की मला आता त्यांच्या मनाच्या झापडबंद प्रवृत्तींवर हसूसुद्धा येत नाही. धार्मिक परंपरा जशा जुन्या आणि कालबाह्य होतात तशाच कलेच्या आणि संस्कृतीच्या परंपरासुद्धा जुन्या होत असतात. वर्तमान काळाकडे डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद बऱ्याच माणसांमध्ये नसते. ती माणसे अशी विधाने करत तेच ते ऐकत आणि पाहत त्याच त्या वाहवा देत कुजत बसतात. सतत काहीतरी भरजरी सुप्रसिद्ध जुने आणि महत्त्वाचे ऐकण्यापेक्षा थोडे ओधडबोधड का असेना पण आज तयार होणारे ताजे संगीत ऐकावे. नाहीतर तुम्ही मरणाच्या आधीच मनाने मेलेले राहाल.(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
 

kundalkar@gmail.com