शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आरत्या, मोरया, मोरया आणि गणपती बाप्पाचा गजर, सॅन होजे नगरी दुमदुमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 21:27 IST

सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती.

ठळक मुद्देआरत्या, मोरया मोरया आणि गणपती बाप्पा चा गजरसॅन होजे नगरी दुमदुमली

रेणुका इनामदार

सॅन फ्रांसिस्को बे एरियातील लोकांनी याही वर्षी बाप्पाचे अगदी स्वागत जोरदार केले. पाहताक्षणीच भान हरपावे अशी हि सुबक देखणी, १५ फुटी भव्यदिव्य मूर्ती कमळामध्ये विराजमान होती.सांता क्लारा काऊंटी फेअर ग्राऊंड्स, सॅन होजे येथे झालेल्या या सोहळ्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. भारतातून आलेले आई वडील, काका काकू अगदी भारतात असल्यासारखं वाटतंय गं, हे सांगतांनाचा चेहर्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. 'हजारो मैल दूर राहता पण आपली संस्कृती इतकी छान जपता. असेच काम करीत रहा, तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य उज्वल राहील' असे आशीर्वाद देताना नागपूरहून आलेल्या देसाई काकांना अगदी भरून आलेले.

 

बाप्पाच्या २ दिवसांच्या मुक्कामात बाप्पाला खुश करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तर प्रसादासाठी १०१ किलोचा बुंदीच्या लाडू, उकडीचे-तळलेले-खव्याचे-पेढ्याचे मोदक, घरी केलेले गुलाबजाम, खीर आणि वेगवेगळ्या प्रकारची मिठाई नैवेद्य म्हणून खास.नटून थटून पैठण्या, शालू, जरी काठाच्या साड्याआणि दागिने घालून आलेल्या बायका. धोतर, सलवार कुर्ता, त्यावर पगडी किंवा टोपी घातलेले पुरुष आणि अगदी लहान बाळापासून ते १५-१६ वर्षाची मुले पारंपरिक वेशात या दोन दिवसात बघायला मिळाली.

मराठी हिंदी आरत्या, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाचा गजर आणि भाविकांनी उत्स्फूर्तपणे गायलेले मोरया रे बाप्पा मोरया रे यांनी खरंच सॅन होजे नगरी २ दिव्वास दुमदुमत होती. श्री गजानन महाराज बे एरिया ग्रुपच्या अथर्वशीर्ष पठणाने वातावरण भारावलेले तर स्पार्तन पथकाने जोशदार ढोल ताश्या बरोबर यावर्षी बरची हा नृत्यप्रकार सादर केला.

भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमात स्तोत्र पठण, भजन, गायन, शास्त्रीय नृत्यांचे विविध प्रकार, लोक नृत्य, सिनेनृत्य, लाईव्ह बँडस, वाद्यवादनाचा कार्यक्रम यांचे सादरीकरण झाले. मराठी सिने नृत्यदिग्दर्शका दीपाली विचारे त्यांच्या ग्रुपने लोकनृत्ये आणि बे एरियातील नावाजलेल्या नृत्यगुरूं अनिता, अर्चना, दीप्ती, जया, प्रीती, राधिका, शोतरुपा, शिवा, शुभदा आणि प्रतीक्षा यांच्या ग्रुप्सनी बॉलीवूड सिनेतारकांच्या गाण्यांवर नृत्य करून धमाल उडवून दिली.

अमित पवार आणि आदित्य पटेल या दोन्ही ग्रुपनी धमाकेदार अशी नृत्ये केली. रविवारी रात्री महाआरतीनंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण सोहळ्याला अजूनच रंगत आणली. पंडित विलास ठुसे यांनी गणपतीची स्थापना केली तर २ दिवसातल्या आरत्या अरविंद साळवेकर, रंजना जोशी आणि रविवारची महाआरती-उत्तरपूजा श्री प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते झाली.रेडिओ जिंदगीचे सर्वेसर्वा श्री नीरज धर, सीईओ श्री तारेश आनंद, प्रवीण सुगग्ला, सेहबा शाह यांनी ३ महिने अथक प्रयत्न करून बे एरियातील लोकांना गणेश उत्सवाचा आनंद दिला. नीरा धर यांच्या देखरेखीखाली गणपतीची आरास आणि लोकांच्या स्वागतासाठी कमानी, रंगीबेरंगी पताका, दिव्यांची रोषणाई, झेंडूच्या फुलांच्या माळा अशी संपूर्ण परिसराची सुंदर सजावट होती. सांस्कृतिक कार्यक्रमाची धुरा ज्यात ९०० च्या वर कलाकारांनी गणपतीसमोर आपली गायन, वादन, नृत्य सेवा सादर केली ती रेणुका इनामदार यांनी यशस्वीरीत्या पेलली.व्हिसिटर्सप्लॅन .कॉमचे राम आणि धर्मेश वर्मा, डिव्हाईन वास्तूच्या रेवा आणि रितेश कुमार, ओन स्वीट होम रियल्टीचे अमित इनामदार आणि अनेक व्यावसायिक यांच्या सहकार्याने हा सोहळा अतिशय उत्तम पार पडला. नियोजनात इरा नाईक, सोम्या महासेठ, मायकल चांद, याशिका अहुजा, चिंतन सोधा, मीनल उगले, अंकित शाह, मनोज सुधाकर, विशाल कपूर, सनी मोझा, सुनीता राज, कुंजन सक्सेना, स्वाती राऊत, वेदिका, दक्षता आणि अनेक कार्यकर्त्यांची मदत झाली. 

बाप्पाच्या उत्तरपुजेनंतर छोट्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक- गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याच्या गजरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. अमेरिकेतल्या पश्चिम विभागातील सार्वजनिक गणपती अशी हि रेडिओ जिंदगी गणपतीची ओळख आता झाली असून पुढच्या वर्षीच्या बाप्पाच्या आगमनाची सगळे पुन्हा आतुरतेने वाट बघत आहोत.रेणुका इनामदार, सॅन होजे, कॅलिफोर्निया

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८