शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलखावेगळी माणसे: सत्यवृक्षाची पूजा बांधणारा निसर्गप्रेमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:22 IST

Mahesh Khare: चतुरंग संस्थेच्या संस्कारशील परंपरेत वाढलेला डोंबिवलीचा महेश खरे याने बघता-बघता रूढ मार्ग सोडून एका मोठ्या शैक्षणिक कार्यास वाहून घेतले ! ही मोठीच उडी होय.

- दिनकर गांगलचतुरंग संस्थेच्या संस्कारशील परंपरेत वाढलेला डोंबिवलीचा महेश खरे याने बघता-बघता रूढ मार्ग सोडून एका मोठ्या शैक्षणिक कार्यास वाहून घेतले ! ही मोठीच उडी होय. कारण, महेशचे शिक्षण आणि नोकरी व्यवसायकलेशी संबंधित. त्याचा हात चित्रकाराचा, त्याने शिक्षण घेतले ते जेजेमध्ये, डोंबिवलीत व्यवसाय केला तो डिझायनिंग आणि ॲडव्हर्टायझिंगचा. त्याने चाकोरी बदलली आणि तो ‘माधवबागे’च्या ‘आरोग्य संस्कार’ मासिकाचा संपादक झाला, तरी त्याची नजर ‘लेआउट’वर खिळलेली असे आणि ‘माधवबागे’चा विस्तार साधण्याच्या किरण भिडेच्या मोहिमांत तो महत्त्वाचा शिलेदार राहिला. त्यानंतर चाचपडण्याचा काळ आला, तेव्हा त्याने डोंबिवली-मुंबईचे शहरी जीवन सोडून दिले. त्याच्या बायकोने - पूनमने त्याला अनुमती दर्शवली आणि तीही खेड्यात काम करू लागली.

महेश बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या सोनदरा दरीतील डोमरीच्या ‘गुरुकुल’ शाळेत निवासी कार्यकर्ता म्हणून गेला. शाळा संचालकांची दृष्टी अभिनव आहे. खेड्यापाड्यांतून आलेली मुले सर्वांगीण तयारीची व्हावीत, अशी संचालकांची धारणा आहे. शाळेला एकोणचाळीस वर्षे झाली आहेत.

महेश हा त्यांना तशाच वृत्तीचा कार्यकर्ता लाभला. शाळेची सुरुवात औदुंबराचा वृक्ष लावून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली होती. तोच धागा पकडून शाळेने वृक्षसंवर्धन हा त्यांचा विशेष कार्यक्रम मानला. विश्वस्त, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी निमित्तानिमित्ताने झाडे लावत गेले. सुमारे सहाशे वृक्ष कमीजास्त वयाचे तयार झाले आहेत. महेशने त्याला पर्यावरणाचा अर्थ दिला. त्याभोवती परंपरेचे कोंदण रचले. महेशने चक्क सत्यवृक्षाची पूजा शाळेत बांधली! त्यासाठी निमित्त केले गेल्या वर्षी लावलेल्या झाडांच्या पहिल्या वाढदिवसाचे. सत्यवृक्षाची पूजा गुरुपौर्णिमेलाच झाली. त्यासाठी महेशने आयुर्वेद ग्रंथातून वृक्षमहतीचे श्लोक जमा केले. भालचंद्र दांडेकर या उच्चशिक्षित पुरोहित मित्राची मदत घेतली. प्रत्यक्ष पूजेमध्ये चौरंगावर दुर्मीळ रुद्राक्ष वंशाचे रोपटे ठेवले. खरे व शाळेचे मुख्याध्यापक दादाराव चव्हाण यांनी पूजा सांगितली. पूजेतील कहाणी ‘सत्यनारायणा’च्या धर्तीवर रचली. पण, या कथेतील पात्रे म्हणजे वृक्षसंवर्धन चळवळीतील वेगवेगळे पुरुष-स्त्रिया होत्या - अमृतादेवी बिश्नोई, चिपको बहाद्दर, जंगलवीर जादव पायेंग, बीजमाता राहीबाई वगैरे... यांच्या सत्यकथांनी सत्यवृक्ष पूजेचा भाग रंगला.

प्रसादात शिरा ठेवला, तर इंधनामुळे ऊर्जानाश होईल, तेव्हा दही-पोह्यांचा खुमासदार प्रसाद करून त्यावर चव आणि गार्निशिंग म्हणून डाळिंबाचे दाणे टाकले. पूजेची सांगता उपस्थित सर्व मंडळींनी दोनशे नवी झाडे लावून केली. आधीची झाडे जशी वाऱ्यावर डोलतात, तशी ही झाडेदेखील उंचउंच जातील, अशा विश्वासाने मंडळी पांगली. महेश म्हणतो, आधुनिक काळात चांगल्या रूढीपरंपरा रुजणे महत्त्वाचे आहे आणि कालानुरूप ‘नवरचना’ हे ज्या शाळेचे ध्येयव्रत आहे, त्या सोनदरा गुरुकुलासारखी दुसरी जागा त्यासाठी कोणती?

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रEducation Sectorशिक्षण क्षेत्र