25 राज्यं, 14000 कि.मी., 7 महिने.
By Admin | Updated: August 8, 2015 13:00 IST2015-08-08T13:00:54+5:302015-08-08T13:00:54+5:30
मानसिक आरोग्याविषयी देशाच्या कानाकोप:यात काय परिस्थिती आहे, त्यासाठी काय करावं लागेल याचा अभ्यास त्याला करायचा होता. पण केवळ संख्यांचे आकडे जमवून निष्कर्ष काढणंही मान्य नव्हतं. प्रश्न खरंच समजून घ्यायचा असेल, लोकांशी ‘कनेक्ट’ व्हायचं असेल तर सायकलशिवाय पर्याय नाही असं त्याचं ठाम मत होतं. आणि तो निघाला.

25 राज्यं, 14000 कि.मी., 7 महिने.
>मानसिक प्रश्नांच्या अभ्यासासाठी ध्येयवेडय़ा सचिन गावकरची दुचाकी परिक्रमा.
अभिजित सप्तर्षी
प्रवास पुढे सुरूच राहतो, रस्ते मागे पडत जातात; निरोप देणा:या डोळ्यांच्या, मनात वस्त्या वाढत जातात’, असे म्हणत 223 दिवसांत, 25 राज्यांची 14क्क्क् किलोमीटरची सायकल परिक्रमा करून डोंबिवलीकर सचिन गावकर 15 ऑगस्टला घरी परतत आहे.
जे.जे.तून शिल्पकला शिकून नंतर प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींच्या कढ या संस्थेशी जोडला गेलेला सचिन ‘संस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनासाठी काहीतरी वेगळे करावे’ या ध्येयाने अस्वस्थ होत होता.
मानसिक आरोग्याविषयी देशातील कानाकोप:यात काय परिस्थिती आहे आणि या क्षेत्रत कसे काम करता येईल हा सव्र्हे त्याला करायचा होता. पण केवळ चार शहरांत जाऊन आकडे जमवणो आणि नंतर ऑफिसमध्ये बसून निष्कर्ष काढणो पटत नव्हते. देश जवळून पाहायचा असेल आणि लोकांशी कनेक्ट व्हायचे असेल तर सायकलसारखे दुसरे वाहन नाही असे त्याचे ठाम मत होते. शेवटी आरोग्य, पर्यटन आणि पर्यावरण अशा तिन्ही गोष्टींची सांगड घालत ही साहसी मोहीम ठरली. जमेला होते संस्थेतले कार्यकर्ते, खंबीर सहचारिणी माणिक आणि ‘अतिथी देवो भव’ मानणा:या भारतीयांवरचा विश्वास. 7 जानेवारी 2क्15 ला ठाण्यातून सचिन निघाला. रोज सुमारे 8क् किमीचा प्रवास करताना वाटेत मानसिक आरोग्याच्या क्षेत्रत काम करणा:या संस्थांना भेट देत आणि कार्यकत्र्याच्या समस्या जाणत त्याचा प्रवास झाला.
मानसिक आरोग्य आपल्याकडे खूप दुर्लक्षिले जाते. अज्ञान, कोण काय म्हणोल अशी भीती आणि गैरसमजुतीने लोक गप्प बसतात. वेळीच निदान न झाल्याने समस्या वाढतात हे जाणवत राहिले. ‘‘आपले मन हे सायकलच्या चेनप्रमाणो आहे. चेन कुरकुरू लागली की तिला साफ करणो आणि वंगण लावणो अनिवार्य असते तसेच मनाचे आहे. यामुळे मदत घेताना लाजायचे कारण नाही,’’ असे सचिन म्हणतो.
प्रवासात कधी हॉटेलची वातानुकूलित खोली मिळाली, तर कधी गळणा:या छपराखाली पथारी पसरावी लागली. कोणी गरमागरम जेवण दिले, तर कुठे बिस्कीट आणि चहावर भागवावे लागले. या सगळ्या अनुभवांकडे साक्षीभावाने बघणो शिकत मार्गक्रमणा होत होती. सचिनने कन्याकुमारीत सूर्यास्त पाहिला, शांतिनिकेतनातला वसंतोत्सव अनुभवला, तर लडाखला ‘फुन्सुक वान्ग्डू’शी चर्चा केली. इंफाळला ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्यम यांनी आशीर्वाद दिला, तर गंगटोकला सिक्कीमच्या राज्यपालांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली.
देशाच्या दुर्गम भागात काम करणारे मराठी अधिकारी आणि कार्यकर्ते भेटत गेले. रोजचे अनुभव फेसबुकवर लोकांपर्यंत पोचत होते, नवे मित्र जोडत होते आणि प्रेरित करत होते. कित्येक ठिकाणी स्थानिक सायकलवेडे सामील होत होते. भाषा आणि संस्कृतीचा अडसर गौण ठरत होता.
पण सारा प्रवास काही सुरळीत झाला असे नाही. विशेषत: पूर्वांचलात रस्त्यांची अवस्था नाजूक होती. चिखलामुळे ब्रेक खराब होत होते. इतरत्र असलेल्या खड्डय़ांची चर्चा नकोच. राजस्थानात तापलेल्या रस्त्यांनी टायरटय़ूब फुटल्या. ब:याचदा बरोबर असलेले सामान सायकल दुरुस्त करायला अपुरे पडत होते आणि सायकल दुरुस्त करू शकेल असे दुकान शेकडो मैल दूर होते. अनेक ठिकाणी नियोजित मार्गावरील रस्ता वाहून किंवा खचून गेल्याने माघारी फिरून परत नवा रस्ता शोधावा लागत होता. तुफान पाऊस, रणरणते ऊन आणि हाडे गोठवणारी थंडी असे हवामानातले अनेक बदल अनुभवणो होते.
या अनोख्या परिक्रमेत नैसर्गिक आपत्तीपेक्षा मनुष्यनिर्मित आपत्ती जास्त आल्या. एकटा सायकलस्वार बघून त्याला कट मारणारे आणि झालेली फजिती पाहून खिदीखिदी दात काढणारेही अनेक ठिकाणी भेटले. ‘तुमची सायकल मला चालवू द्या’ म्हणून बळजबरी करणारे दारुडे भेटले. एका ठिकाणी तर बघ्यांची गर्दी जमल्यावर ‘अरे ये पाकिस्तानी है!’ अशी फूस लावून पळून जाणारा महाभाग दिसला.
‘आम्ही मदत करू’ असे आश्वासन देऊन केवळ सेल्फी काढून निघून जाणारे ‘सेल्फिश’ अनेक होते. जगातले सर्वात मोठे नदीतले द्वीप असलेल्या आणि वैष्णवांचे महत्त्वाचे स्थान माजुलीमध्ये पाकीटमाराने प्रसाद दिला. पैशाबरोबर ओळखपत्र आणि बँकेची कार्डे गेली. तरीही इच्छाशक्तीच्या जोरावर सचिन पुढे जात राहिला.
जसे वाईट अनुभव आलेत त्याहून अधिक चांगले अनुभव मिळतील आणि प्रत्येक माणसात चांगुलपणा शोधायची पद्धत यामुळे सचिन टिकून राहिला. कुठून कुठून मदत मिळत राहिली. एखाद्या राजभवनात शाही सरबराई झाली आणि तोडीस तोड वाटावी अशी व्यवस्था व प्रेम मिळाले मणिपूरच्या एका मोडक्या तोडक्या ढाब्यावर. अनेकदा भर तापात प्रवास चालू होता, तर कुठे कोणी घरी ठेवून घेऊन तब्येत ठणठणीत होईपर्यंत सुश्रूषा केली. रक्ताच्या नात्यांपेक्षा उजवी ठरवीत अशा मनाच्या नात्यांची गुंफण करत परिक्र मा होत राहिली. त्याच्यासाठी तीस किलोमीटर सायकल हाकत घरचे जेवण घेऊन आलेला कुलवंत सिंग आणि नुकतीच अॅन्जिओप्लास्टी होऊनही मनाली-लेह सोबत करणारे महाडिककाका असेच खास.
आपण कित्येकदा स्वत:ला कमी लेखतो आणि असीम स्वप्नांना सीमारेषेत बांधतो. ‘यापेक्षा जास्त मला जमणार नाही, माङो शरीर साथ देणार नाही, यापूर्वी कोणी असे केले आहे का?’ वगैरे वगैरे रडगाणो रडत राहतो. मग सबब सांगणो अंगवळणी पडते. स्वत:भोवती कोश बनवून आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून जगाला गवसणी घालायला विसरतो. टीव्ही आणि इंटरनेटच्या पलीकडले सजीव जग अनुभवायचे सोडून देतो. त्याचवेळी मध्यमवर्गीय घरातून आलेला एकजण, अस्थमा असून आणि पैशाचे फारसे पाठबळ नसताना एका ध्येयाने झपाटून दोन चाकांवर स्वार होतो व देशभ्रमण करतो. थोडाही भाव न खाता केवळ ‘इदं न मम’ असा भाव घेऊन तो परततो आणि पुढच्या साहसाच्या तयारीला लागतो.
सचिनच्याच शब्दात सांगायचे तर. ‘प्रयत्नांच्या वेदनाही प्रेरणोचे स्रोत होतात, मैलाचे दगड सारे स्वप्नांचे दीप होतात.’
27 किलोचं बि:हाड!
नित्योपयोगी वस्तू, कपडे, सायकलचे पार्ट्स आणि या सर्व टोकाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागणारे सामान सायकलवर लादणो हे मोठे कौशल्याचे काम असते. एकेका ग्रॅमचा विचार करून रोज सकाळी सामानाची बांधाबांध आणि रात्री पुन्हा बॅगा उघडणो म्हणजे संयमाची परीक्षा असते. बरोबर कोणी सहायक नाही किंवा मागोमाग चालणारी गाडी नाही. त्यामुळे 27 किलोचे बि:हाड वागवत प्रवास सुरू राहिला.
कधी कधी शरीर थकायचे, वैताग यायचा आणि वाटायचे की इथेच थांबावे आणि परिक्रमा अर्धवट टाकून परतावे. खरी लढाई चालायची मनात. अशावेळी स्वत:चे कौन्सेलिंग करावे लागायचे आणि स्वत:च स्वत:चा प्रेरणास्रोत बनून मरगळ झटकली जायची. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती.’ म्हणत आणि मानसिक आरोग्याच्या क्षेत्रत आपले अनोखे योगदान देत सचिनचा प्रवास चालू होता.
(लेखक आयपीएस अधिकारी असून
सध्या त्रिपुरा येथे कार्यरत आहेत.)
abhijitjs@yahoo.com