शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत मतभेदाची भाजपला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:51 IST

वंचित बहुजन आघाडीही रिंगणात । दोन्ही उमेदवार टाळताहेत वैयक्तिक टीका

लेवा पाटील समाजाचे प्राबल्य असलेल्या एकमेव रावेर लोकसभा मतदार संघात भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सून व विद्यमान खासदार रक्षा खडसे तसेच माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यातील लढत लक्षवेधी ठरत असताना वंचित बहुजन आघाडीने या लढतीत रंग भरला आहे.

भाजपाकडून खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली असताना काँगे्रस व राष्ट्रवादी यांच्यामध्ये अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत ही जागा कुणी लढवावी यावरून एकमत होत नव्हते. शेवटी उमेदवारच न मिळाल्याने हतबल ठरलेल्या राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे कमी दिवसात संपूर्ण मतदार संघ पिंजून काढण्याचे आव्हान काँग्रेसचे उमेदवार व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासमोर आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांचा या मतदार संघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यातच गेल्या वेळी झालेल्या निवडणुकांचा देखील अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना हमी भाव, भुसावळचा पाणी प्रश्न, रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, केळीला मिळणारा भाव यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते प्रचार करीत आहेत.

तर खासदार रक्षा खडसे यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा अहवाल मतदारासमोर सादर करीत मोदींना मत म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला मत असे भावनिक आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर हा विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुुळे महाजन व त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन प्रचारात सक्रीय आहेत. दोन्ही उमेदवार हे सुसंस्कृत आणि उच्चशिक्षीत आहेत. त्यामुळे वैयक्तिक टिका टिप्पणीपेक्षा केलेली विकास कामे आणि पुढील संकल्प या मुद्यांवर दोघा उमेदवारांकडून प्रचारात भर देण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांनी दलित, मुस्लीम, मराठा व बहुजन यांना एकत्र घेतले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुक्ताईनगरात सभा घेतली आहे. काँग्रेस राहुल गांधी यांच्या तर भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी प्रयत्न करीत आहे. जळगावात भाजपच्या उमेदवारीवरून झालेल्या वादाचे पडसाद रावेमध्येही उमटण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून असलेल्या रक्षा खडसे यांनी जिल्हा परिषदेपासून राजकीय जीवनाला सुरुवात केली. शिक्षण सभापती आणि त्यानंतर २०१४ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्यात. रेल्वे आणि केळी या दोन विषयावरील प्रश्न त्यांनी लावून धरले. लेवा व गुजर या दोन्ही मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे.

काँग्रेसकडून खासदार राहिलेले डॉ.उल्हास पाटील यांनी विविध शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क कायम ठेवला.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. लेवा समाजाचे वर्चस्व असलेल्या या मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांचे वैयक्तिक संबध आहेत.

टॅग्स :raver-pcरावेरEknath Khadaseएकनाथ खडसे