शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेने पाठिंबा मागितल्याचा एमआयएम नेत्यांनी केला दावा, मालेगावात सत्ता स्थापनेच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:52 IST

Malegaon Municipal Election Result 2026 : मालेगाव महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

मालेगाव - मालेगाव महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात असतानाच एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमात केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेनेने एमआयएमकडे पाठींबा मागितला असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव गेला नसल्याचे शिंदेसेनेकडून सांगण्यात आले.

मालेगाव महापालिकेत 'इस्लाम' आणि समाजवादी पार्टीच्या सेक्युलर फ्रंटचे एकुण ४० नगरसेवक निवडून आले आहेत. बहुमतासाठी त्यांना ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. याचसाठी इस्लाम पार्टीचे सर्वेसर्वा माजी आमदार आसिफ शेख यांनी सत्ता स्थापनेसाठी शिंदेसेना आणि एमआयएमला देखील साद घातलेली होती, याशिवाय त्यांनी काँग्रेस आणि एमआयएमसोबत युती न करण्याचे देखील स्पष्ट केले होते. त्यामुळे पेच वाढलेला असतानाच एमआयएमच्या दाव्याने ट्रिस्ट आला आहे. मात्र भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिंदेसेनेबाबत कोणताही घरोबा करणार नसल्याचे देखील जलील यांनीच स्पष्ट केल्याने एमआयएम आणि शिंदेसेना असे समीकरण जुळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून अधिक माहिती देण्याचे टाळण्यात आले.

मनपातील बलाबल

इस्लाम पार्टी - ३५समाजवादी - ५एमआयएम - २१शिंदेसेना - १८भाजप - २काँग्रेस - ३

राजकीय पक्षांकडून पत्ते गुलदस्त्यात

मालेगावातील एकुणच राजकीय परिस्थिती पाहाता सत्तेत सहभागी होण्यासाठी सर्वच पक्षांना संधी असल्याने त्यादृष्टीने राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. निवहणुकीत एकमेकांच्या विरोधातील पक्ष सत्तेत सहभागी होणार की काठावरील बहुमताचर सत्ता स्थापन केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

युती संदर्भात अद्याप नवीत कोणतीही घडामोड नाही. महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच पक्षाकडून योग्य ती भूमिका स्पष्ट केली जाईल. सध्यातरी कोणताही प्रस्ताव कुणालाही दिलेला नाही.अॅड. संजय दुसाने, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना ग्रामीण

शिंदेसेना असेल सत्तेत?

मालेगावात सत्तेची समीकरण जुळविले जात असतांना शिंदेसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली जाणार असून शिंदेसेना सत्तेत असेल असा दावा पक्षाच्या एका नेत्याकडून खासगीत केला आहे. महापौर पदाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर इस्लाम सोबत कोण जाणार किंवा इस्लाम कुणाला सोबत घेणार यावरचा सस्पेन्स उघडणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena faction seeks support, Malegaon power play intensifies.

Web Summary : Malegaon's political scene heats up as the Shinde Sena allegedly seeks support from MIM to form a government. Despite claims, Shinde Sena denies any such proposal. All eyes are on the upcoming mayoral election.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Malegaon Municipal Corporation Electionमालेगाव महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMalegaonमालेगांव