मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत ३०१ उमेदवार नशीब आजमावत असून, त्यामध्ये १३१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये अपक्ष २३ महिला देखील राजकीय पक्षांसमोर निवडणक रिंगणात आहेत.
मनपाच्या ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यात १३१ महिला उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आहेत. यातील एक महिला बिनविरोध झाल्याने उर्वरित ८३ जागांसाठी १३० महिला लढत आहेत. मनपाच्या २१ प्रभागांतील ४२ जागा महिलांसाठी विविध वर्गात राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा चार प्रवर्गाचा समावेश आहे. शिंदेसेना, भाजप, उद्धवसेना, मालेगाव सेक्युलर फ्रंट, एमआयएम, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी आदी पक्षांच्या उमेदवारांबरोबरच २३ महिला अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत उत्तरल्या आहेत.
२१ पैकी १५ प्रभागांमध्ये अपक्ष महिला
एकुण १५ प्रभागांत २३ महिला अपक्ष उमेदवारी करत असून, सहा प्रभागांत एकही अपक्ष महिला उमेदवार नाही. यात सर्वा जास्त अपक्ष महिला उमेदवार मनपाच्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये आहेत. या प्रभागात पक्षीय उमेदवारांसह १९ उमेदवा निवडणुकीत असून, त्यात ९ महिला उमेदवार आहेत. तर अपक्ष महिला उमेदवारांची संख्या ५ इतकी आहे. दुसरीकडे सर्वांत कमी महिला उमेदवार प्रभाग ६ मध्ये आहेत. या प्रभागातील ११ पैकी ३ महिला पक्षांकडून उमेदवारी करत आहेत. त्यानंतर प्रभाग १७ चा क्रमांक लागत असून, तेथे चार महिला आहेत.
बंडखोरीमुळे अपक्ष उमेदवारी
मालेगाव महापालिकेत अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. पुरुष उमेदवारांनी काही ठिकाणी केलेली बंडखोरी यामुळे अपक्ष उमेदवारांची संख्या अधिक आहे. अपक्ष महिला उमेदवारांची संख्या २३ असून त्यांनी आव्हान उभे केले आहे.
महिला उमेदवार १३१
पुरुष उमेदवार १७०
Web Summary : 301 candidates, including 131 women (23 independents), are vying for 84 Malegaon Municipal Corporation seats. 42 seats across 21 wards are reserved for women. Independent women are contesting in 15 wards, posing a challenge to established parties.
Web Summary : मालेगांव महानगरपालिका चुनाव में 131 महिलाओं (23 निर्दलीय) समेत 301 उम्मीदवार 84 सीटों के लिए मुकाबला कर रहे हैं। 21 वार्डों में 42 सीटें महिलाओं के लिए आरक्षित हैं। 15 वार्डों में निर्दलीय महिलाएं चुनाव लड़ रही हैं, जिससे स्थापित पार्टियों को चुनौती मिल रही है।