चंदनपुरीत गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला, शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:52 IST2022-09-10T14:46:32+5:302022-09-10T14:52:21+5:30
गणेश विसर्जनासाठी अनिल आहिरे हा चंदनपुरी येथील गिरणा नदी पात्रात गेले होते. यावेळी त्याचा पाय घसरून पडल्याने ते पाण्यात बुडाले.

चंदनपुरीत गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुण बुडाला, शोध सुरू
अतुल शेवाळे
मालेगाव - शहरालगतच्या चंदनपुरी येथे गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अनिल भीमराव अहिरे (२५) रा चंदनपुरी हा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने तो बुडाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे. शनिवारी गणेश विसर्जनासाठी अनिल आहिरे हा चंदनपुरी येथील गिरणा नदी पात्रात गेले होते. यावेळी त्याचा पाय घसरून पडल्याने ते पाण्यात बुडाले.
अग्निशमन दलाचे जवान शकील अहमद मो साबीर, मनोहर तिसगे, राशीद अख्तर ,मोहम्मद इस्माईल, जयेश सोनवणे आदी जवान चंदनपुरी ते सवंदगाव दरम्यानच्या नदीपात्रालगत शोध घेत आहेत. तर मथुरपाडे शिवारातील गिरणा नदीपात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस अनोळखी इसमाचा नातलगांचा शोध घेत आहेत.