मालेगाव: शहरातील कॉलेज स्टॉप येथे फुगे भरण्याच्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन महिलांसह एक मुलगा असे पाच जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान सहाय्यक पोलीस अधिक्षक दर्शन दुग्गड यांनी केले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी गॅसचे फुगे विकण्यासाठी आलेले होते. यातील कॉलेज स्टॉप जवळ एका फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलेंडरचा सोमवारी (ता.२६) सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात विनोद थोरात, अतुल शेवाळे, प्रमिला निंबा यादव, उज्वला महाजन व मोहित योगेश जाधव हा पंधरा वर्षीय मुलगा जखमी झाला. या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यातील विनोद थोरात, अतुल शेवाळे, प्रमिला यादव, उज्वला महाजन हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यांना उपचारार्थ नाशिक येथे पाठविण्यात आले आहे. तर मोहित जाधव याच्यावर शहरातील प्रयास रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर अफवा पसरल्या असुन पोलीस प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन केले आहे. पोलीसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी कॅम्प पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
शहरात अनेक जण असे गॅस भरुन फुगे विकण्याचा धंदा करतात. यापूर्वीच शहराच्या पुर्व भागात तिन ते चार दिवसापूर्वी झालेल्या स्फोटात विक्रेता जखमी झाला होता.
Web Summary : A nitrogen gas cylinder exploded in Malegaon, injuring five, including two women and a child. Police are investigating the incident and urge the public to avoid rumors. This is the second such incident this week.
Web Summary : मालेगांव में नाइट्रोजन गैस सिलेंडर फटने से दो महिलाओं और एक बच्चे सहित पांच लोग घायल हो गए। पुलिस मामले की जांच कर रही है और जनता से अफवाहों से बचने का आग्रह कर रही है। इस सप्ताह में यह दूसरी घटना है।