शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. पोटनिवडणूक होणारच; आरक्षण अध्यादेशानुसार घेण्याची विनंती आयोगाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 06:41 IST

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आयोग ही निवडणूक घेत असल्याने ती रद्द करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्य शासनाला कळविले आहे.

मुंबई : सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी फेटाळली. 

नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये ही पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे आयोग ही निवडणूक घेत असल्याने ती रद्द करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी राज्य शासनाला कळविले आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या ठिकाणी ही पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातच होणार आहे. 

त्या आधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करण्यासंबंधीचा अध्यादेश काढला. त्याची प्रत जोडून आयोगाला शासनाकडून विनंती केली की, अध्यादेशान्वये पोटनिवडणूक घ्यावी. आयोगाने त्याला नकार दिल्याने अध्यादेशाच्या आधारे पोटनिवडणूक स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. 

जि. प. पंचायत समिती आणि ग्राम पंचायतींमध्ये ओबीसी, एससी, एसटींना वगळून ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देण्याची तरतूद असलेला अध्यादेश राज्य शासनाने काढला. एससी व एसटी प्रवर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले जाते. ते वगळून उर्वरित पण ५० टक्क्यांपर्यंत ओबीसींना आरक्षण बहाल करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध - - आयोगाने शासनाला कळविले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ ऑक्टोबरची पोटनिवडणूक आम्ही घेत आहोत. ५ ऑक्टोबरपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला तर आयोग त्यानुसार कार्यवाही करू शकेल. - याचा अर्थ ही पोटनिवडणूक रद्द व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमेव पर्याय आता शिल्लक आहे.  सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन दाद मागू शकेल किंवा ओबीसींच्या आरक्षणाशिवाय पोटनिवडणूक होत असल्याचा फटका बसलेले काही राजकीय कार्यकर्ते, नेतेही दाद मागू शकतील.  

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदElectionनिवडणूकnagpurनागपूरDhuleधुळेAkolaअकोलाwashimवाशिमpalgharपालघर