शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी, पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचं खातं उघडलं, कोकणात दोन जागा बिनविरोध? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 15:32 IST

ZP Election Update: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. मात्र आता राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही बिनविरोधच्या माध्यमातून भाजपाचं खातं उघडलं आहे.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या अनेक जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. मात्र आता राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही बिनविरोधच्या माध्यमातून भाजपाचं खातं उघडलं आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या पंचायत समितीच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे आणि कणकवली तालुक्यातील बिडवाडी या पंचायत समितीच्या गणांमधून भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 

त्यापैकी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे पंचायत समिती गणामध्ये भाजपाच्या साधना नकाशे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबतच भाजपाच्या अक्षता डाफळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या दोन अर्जांव्यतिरिक्त कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नसल्याने अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाल्यावर कोकिसरेमधून भाजपाच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय जवळपास निश्चित आहे.

तर कणकवली तालुक्यामधील बिडवाडी पंचायत समितीच्या गणामध्येही भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. बिडवाडीमध्ये भाजपाच्या उमेदवार संजना राणे यांनी उद्धवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांना २०१४ नंतर तीन अपत्ये झाली असल्याचा मुद्दा उपस्थित करत हरकत घेतली. त्यानंतर निवडणूक निर्णय़ अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे भाजपाच्या संजना राणे यांचा विजयही निश्चित झाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपण्यापूर्वीच भाजपाच्या खात्यात दोन जागा जमा झाल्या आहेत.   

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Opens Account in ZP, Panchayat Samiti Polls; Two Unopposed?

Web Summary : BJP secured initial wins in ZP, Panchayat Samiti elections with two unopposed victories in Sindhudurg's Kokisare and Bidwadi. Nominations of rivals were rejected.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा