शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:28 IST

कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचे समुपदेशन

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: जिल्हा परिषदांच्या महिला व बाल कल्याण समितीमार्फत जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना, तसेच महिला शिक्षकांना ज्युडो कराटे, योग आणि जीवन कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, कौटुंबिक अत्याचारांविषयी ग्रामीण महिलांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.

महिला व मुलींवर होणारे अन्याय, त्यांचे होणारे लैंगिक शोषण अशा अत्याचारांना सक्षमपणे तोंड देता यावे, यासाठी इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या व महाविद्यालयांतील मुलींना, तसेच इच्छुक महिला शिक्षकांना ज्युडो कराटे आदींचे प्रशिक्षण ९० दिवस किंवा १२० तास दिले जाईल. कुटुंबातील मारहाण, लैंगिक छळ वा अन्य कारणांनी मानसिकदृष्ट्या खचलेल्या महिलांचे सामाजिक, मानसशास्रीय आणि कायदेशीर समुपदेशन केले जाईल.

वसतिगृहे नसलेल्या ठिकाणी भाडेतत्वावर इमारत, घर, फ्लॅट घेऊन गरजू मुलींच्या निवासाची मोफत व्यवस्था करण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला आहे. जेवणाचा खर्च मुलींना करावा लागेल. ग्रामीण भागातील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करण्याची स्थायी व्यवस्था उभी केली जाणार आहे.

दुर्धर आजारी मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी अर्थसाहाय्य

  • हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलामुलींच्या हृदय शस्रक्रिया, अस्थिव्यंगावरील शस्रक्रिया, सेरेब्रलपाल्सी, कर्करोग, किडणीतील दोष अशा गंभीर शस्रक्रियांसाठी अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. प्राथमिक तपासणीसाठी १५ हजार व शस्रक्रियेसाठी ३५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाईल. 
  • घटस्फोटित, परितक्त्या व गरजू महिलांना घरकुलासाठी ५० हजार, अनाथ मुलींना शालेय साहित्य, इतर खर्चासाठी २ हजार रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य. अतितीव्र कुपोषित बालके नसलेल्या ग्राम पंचायतीला ५० हजाराचे बक्षीस दिले जाईल.

ग्रामीण भागातील मुली, महिलांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.-जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

टॅग्स :Jaykumar Goreजयकुमार गोरेStudentविद्यार्थीTeacherशिक्षक