शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 14:05 IST

राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुकांबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबई - राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर टाकण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुकाही काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या तसेच विषय समिती सभापतीपदाच्या निवडणुका आणि पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणुका काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्या. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय 1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसह विधवा लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ.2. सर्वांसाठी घरे धोरणाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागातील अतिक्रमणांबाबत समिती स्थापन करण्याचा निर्णय.3. जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुका तात्पुरत्या लांबणीवर.4. राज्य निवडणूक विभाग नव्याने निर्माण करून त्यासाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत.5. केंद्र शासनाच्या निर्भया निधी योजनेत मुंबईसह इतर डीएनए फॉरेन्सिक लॅबच्या सक्षमीकरणाबाबत.6. गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव येथे केंद्रीय विद्यालयास भाडेपट्ट्याने जमीन देण्याबाबत.7. चंद्रपूर जिल्ह्यातील मौजे कोर्टी मोक्ता येथे भारत राखीव बटालियन क्र.4 अकोला जिल्ह्यातील मौजा शिसा उदेगाव येथे भारत बटालियन क्र. 4 आणि जळगाव जिल्ह्यातील हातनूर येथे राज्य राखीव पोलीस गट स्थापन करण्यास मान्यता.8. विद्यापीठ विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांबाबत.9. तिरुपती देवस्थान संस्थेसाठी शासकीय जागा देण्याबाबत. 10.  प्रगतीपथावरील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र