शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

३ काय ३० पक्ष एकत्र आले तरी...; युवासेनेचा मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 13:20 IST

या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं. 

सोलापूर - गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्होवो. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत असा खोचक टोला युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसे-भाजपा-शिंदे गट संभाव्य युतीवर खोचक टोला लगावला आहे. 

निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई तुळजापुरात पोहचले होते. यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ लढणार नाही तर जिंकणार आहोत असा विश्वास युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला. 

आदित्य ठाकरेंची भूमिका महत्त्वाचीआदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले काम केले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या दर्जाला शोभेल असं काम आदित्य ठाकरेंनी केले. मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतायेत. आता जरी आमचं सरकार नसलं तरी लोक हक्काने आदित्य ठाकरेंकडे प्रश्न घेऊन येत आहेत. तेदेखील मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे नेतृत्व जरी उद्धव ठाकरेंचे असले तरी आदित्य ठाकरेंचा चेहरा शिवसेनेसाठी १०० टक्के आश्वासक आहे. मुंबईकर जनतेसाठी आश्वासक आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीला सामोरे जावू. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असंही वरुण सरदेसाईंनी म्हटलं. राज्यातील प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष पण...  राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुठेतरी संघटना वाढवण्याच्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. हे अतिशय दुर्देवी आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विनायक राऊत, भास्कर जाधव हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. आम्हीही निर्धार अभियानाच्या माध्यमातून युवक, तरुणांसमोर जे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करू असा विश्वास वरुण सरदेसाईंनी व्यक्त केला.  

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेVarun Sardesaiवरुण सरदेसाई