शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 10:01 IST

...आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे.

बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई 2019 च्या मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी असेल. असे म्हणत, राषट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारगटाला डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिण्यात आली आहे.

यासंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुराज चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक व्हिडिओ शेअर करत भाष्य केले आहे. या व्हिडियोमध्ये चव्हाण यांनी म्हटले आहे की, "बारामती विधानसभा मतदार संघात युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल आणि अजितदादा पवार यांची लढाई 2019च्या मताधिक्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी असेल. तुतारी गटाकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यात 10 पेक्षा जास्त भाजपमधून आलेल्या निष्ठावान, स्वाभिमानी शिलेदारांना न्याय दिल्याबद्दल मी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!"

काल प्रसिद्ध झाली शरद पवार गटाची पहिली यादीत -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महत्वाचे म्हणजे, यात 11 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात बारामती विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार गटाने युगेंद्र पवार यांना उमेदवारी देत अजित पवार यांना आव्हान दिले आहे. युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू तर अजित पवार यांचे पुतणे आहेत.  

काका विरुद्ध पुतण्या लढतीकडे असणार संपूर्ण राज्याचे लक्ष -  शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात थेट युगेंद्र पवार यांनाच मैदानात उतरवले आहे. यामुळे, आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अथवा काका विरुद्ध पुतण्या, या लढतीकडे असणार आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारyugendra pawarयुगेंद्र पवारSharad Pawarशरद पवारvidhan sabhaविधानसभा