आरेमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

By Admin | Updated: December 23, 2016 04:59 IST2016-12-23T04:59:50+5:302016-12-23T04:59:50+5:30

आरे परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तो गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर

The youth's murderous assassination in Aarey | आरेमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

आरेमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : आरे परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. तो गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.
ब्रॅन्डन गोन्सालवीस (२२) असे या मयत तरुणाचे नाव आहे. ब्रॅन्डन गोरेगाव पूर्वच्या ओबेरॉय मॉलशेजारी असलेल्या पद्मावती को-आॅप. सोसायटीत राहत होता. गोन्सालवीस हा १९ डिसेंबर रोजी घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला सर्वत्र शोधण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी तो हरवल्याची तक्रार आरे पोलिसांकडे दाखल केली.
गुरुवारी सकाळी आरेच्या युनिट क्रमांक २मध्ये असलेल्या झुडपात गोन्सालवीसचे धड आणि डोके वेगळे असलेल्या परिस्थितीत मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. (प्रतिनिधी)

Web Title: The youth's murderous assassination in Aarey