शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

टिक टॉकमुळे पडली तरुणाईच्या कल्पकतेत भर, महिलांच्या तुलनेत पुरुषांकडून जास्त वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 1:38 AM

गायन, नृत्य आणि लिपसिंकिंगच्या आधारे मोठ्या कल्पकतेने व्हिडीओ बनवून ते शेअर करणारे तरुण युजर्स दिवसभरातील सरासरी ५२ मिनिटे वेळ टिक टॉक अ‍ॅपवर घालवत आहेत.

ठाणे : गायन, नृत्य आणि लिपसिंकिंगच्या आधारे मोठ्या कल्पकतेने व्हिडीओ बनवून ते शेअर करणारे तरुण युजर्स दिवसभरातील सरासरी ५२ मिनिटे वेळ टिक टॉक अ‍ॅपवर घालवत आहेत. तसेच दहा पैकी नऊ युजर्स दिवसभरात वारंवार हे अ‍ॅप वापरत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.मूळच्या चीनमधील कंपनीने विकसित केलेले टिक टॉक अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात ५० कोटींपेक्षा अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. तर, भारतातील २० कोटींपेक्षा मोबाइल वापरकर्त्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. तर, १२ कोटी अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. अ‍ॅप युर्जसचे वय १६ ते २४ या वयोगटांतील असून, महिलांपेक्षा पुरुष हे अ‍ॅप वापरण्यात आघाडीवर आहेत. ५५.६ टक्के पुरुष तर, ४४.४ टक्के महिला हे अ‍ॅप वापरत आहेत.सोशल मीडियावरील युट्युब, फेसबुक, इन्स्टिाग्राम यासारख्या गुगलचे मोठे पाठबळ असलेल्या अ‍ॅपना टिक टॉकमुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भारतातील ३० टक्के मोबाइलधारकांनी हे अ‍ॅप इनस्टॉल केले आहे. गंमतीजंमती, मजेशीर व्हिडीओ बनवण्याचे व ते अपलोड करण्याबरोबरच अधिकाधिक लाइक्स मिळवण्याची एक स्पर्धाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये पाहायला मिळत आहे. असे असले तरी केवळ करमणूक, विरंगुळा म्हणूनही या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.दरम्यान, टिक टॉकसाठी व्हिडीओ बनवताना अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील तीन अल्पवयीन मुलांच्या आर्इंनी हायकोर्टात धाव घेत या अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.टिक टॉकमुळे माझ्यासह अनेकांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला विनोदी डायलॉग आणि स्लो मोशन स्टाइलिंग व्हिडीओ बनवायला आवडतात. दिवसाला एक तरी व्हिडीओ बनवतोच. सध्या माझे टिक टॉकवर १८९५ फॉलोअर्स आहेत, असे कल्याण पूर्वेतील हितेश पाटील याने सांगितले.सुप्त कलागुणांना टिक टॉकमुळे आता वाव मिळू लागला आहे. मात्र, अनेक जण स्टंटबाजीसाठी जीव धोक्यात घालत आहेत. व्हिडीओसाठी ठाकुर्लीत चालत्या ट्रेनमध्ये एका तरुणाने चढण्याचा प्रयत्न कला. याबाबत पोलिसांना सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असे प्रकार नेहमीचेच झाल्याचे शुभम कोळंबकर याने सांगितले. 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Mediaसोशल मीडिया