गळफास घेवून युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: January 17, 2017 20:57 IST2017-01-17T20:57:22+5:302017-01-17T20:57:22+5:30
गणेश मांडवे हे सकाळी घरच्या लोकांना शेतात जावून येतो म्हणून गेले. दरम्यान त्याचा चुलत भाऊ संजय बाबुलाल मांडवे हा शेतात

गळफास घेवून युवकाची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
धाड (बुलडाणा), दि. 17 - येथून जवळच असलेल्या ग्राम देवपूर येथील गणेश कोटीराम मांडवे (वय ४० ) या युवकाने आपल्या शेतातील झाडास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. ग्राम देवपूर येथील रहिवासी गणेश मांडवे हे सकाळी घरच्या लोकांना शेतात जावून येतो म्हणून गेले. दरम्यान त्याचा चुलत भाऊ संजय बाबुलाल मांडवे हा शेतात हरबरा सोंगणी करता जात असतांना गणेश मांडवे शेतातील झाडाला गळफास लावून मृतावस्थेत निदर्शनास पडला. या प्रकरणी धाड पोलिसांनी नोंद घेतली. पुढील तपास पी.सी.प्रकाश दराडे, दशरथ शितोळे हे करत आहे.