वडिलांचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: July 21, 2016 10:43 IST2016-07-21T10:43:21+5:302016-07-21T10:43:21+5:30

वडिलांनी केलेले कर्ज फेडू न शकल्याने येथील एका तरुणाने आज पहाटे दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Youth suicide due to non-payment of father's debts | वडिलांचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या

वडिलांचे कर्ज फेडू न शकल्याने तरुणाची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत 

शिर्डी, दि. २१ - वडिलांनी केलेले कर्ज फेडू न शकल्याने येथील एका तरुणाने आज पहाटे दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमोल संघपाळ शेजवळ असे या चोवीस वर्षीय तरुणाचे नाव आहे.
 
अमोलच्या वडिलांनी कर्ज घेतलेले होते मात्र गेल्या दोन वर्षा पूर्वी ते घर सोडून गेल्याने व कुटुंबातील अन्य सदस्य वेगळे झाल्याने अमोलवरच कर्जाचा बोजा पडला होता, किराणा दुकानावर एवढे कर्ज फेडू न शकल्याने अमोलने पहाटे साडे चारच्या सुमारास दुकानात गळफास घेऊन आपले जीवन संपवले अशी माहिती अडव्होकेट अनिल शेजवळ यांनी दिली.दोन वर्षांपूर्वीच अमोलचे लग्न झाले होते, शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Youth suicide due to non-payment of father's debts