अमरावतीतील परवाड्यात वीज पडून युवकाचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 21:48 IST2017-10-08T21:48:06+5:302017-10-08T21:48:12+5:30
पाऊस आल्याने झाडाचा आडोसा घेऊन उभ्या असलेल्या चौघांपैकी एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

अमरावतीतील परवाड्यात वीज पडून युवकाचा मृत्यू, तिघे जखमी
परतवाडा (अमरावती) : पाऊस आल्याने झाडाचा आडोसा घेऊन उभ्या असलेल्या चौघांपैकी एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना अचलपूर तालुक्यातील टवलार शेतशिवारात घडली.
शुभम ज्ञानेश्वर कानतोडे (२४) असे मृताचे नाव आहे. बंडू सुखदेव चांदणे (२६) व राजेंद्र सुखदेव हजारे (२५), मनीष बाबाराव भुस्कुटे (२४, सर्व रा.टवलार) अशी जखमींची नावे आहेत. चौघे शेतात काम करीत असताना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व शेतातील कडुनिंबाच्या झाडाखाली आश्रय घेत बसले होते.
याचवेळी झाडावर वीज कोसळली. सोबत असलेल्या इतरांनी ही माहिती गावक-यांना दिली. जखमीवर परतवाडा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.