लग्नानंतर महिन्याभरातच युवकाचा अपघाती मृत्यू

By Admin | Updated: May 15, 2016 14:31 IST2016-05-15T14:31:06+5:302016-05-15T14:31:06+5:30

लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोच युवकाला अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.

Younger accidental death within a month after the marriage | लग्नानंतर महिन्याभरातच युवकाचा अपघाती मृत्यू

लग्नानंतर महिन्याभरातच युवकाचा अपघाती मृत्यू

 ऑनलाइन लोकमत 

पेठ, दि. १५  - लग्नाला एक महिनाही उलटला नाही तोच युवकाला  अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागल्याने संसाराचा डाव अर्ध्यावर मोडल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. पेठ येथील मच्छी व्यापारी धर्मराज वायडे वय २७  याचा १७ एप्रिल रोजी  विवाह झाला. 
 
शनिवारी रात्री साडेबारा वाजता आपल्या ओमनी कारने सुतार पाडा गुजरात येथून माल घेऊन पेठकडे येत असतांना वांगणीजवळ इंधन संपल्याने रस्त्याच्या कडेला वाहन ऊभे करून इंधन भरत असतांना गुजरातकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने वायडे यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने शेजारीच उभे असलेले वायडे गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनी त्यास पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. 
 
याबाबत पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कोठूळे, तुंगार अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Younger accidental death within a month after the marriage