खडवलीतील भातसा नदीत तरुण बुडाला

By Admin | Updated: May 14, 2017 02:49 IST2017-05-14T02:49:06+5:302017-05-14T02:49:06+5:30

मित्रांबरोबर खडवलीतील भातसा नदीकिनारी आंघोळीसाठी आलेला संदेश यादव (२०, रा. आनंदयात्री, दुर्गामाता मंदिर, काटेमानिवली, कल्याण) हा बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली

The young swim in the river Bhatsa in the dam | खडवलीतील भातसा नदीत तरुण बुडाला

खडवलीतील भातसा नदीत तरुण बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : मित्रांबरोबर खडवलीतील भातसा नदीकिनारी आंघोळीसाठी आलेला संदेश यादव (२०, रा. आनंदयात्री, दुर्गामाता मंदिर, काटेमानिवली, कल्याण) हा बुडाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. स्थानिक पोलीस व केडीएमसीच्या अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.
संदेश हा एका कॅटर्समध्ये कामाला आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास तो खडवली येथील भातसा नदीकिनारी पिकिनक पॉइंट येथे आला होता. त्यावेळी त्याच्या समावेत कॅटर्समध्ये काम करणारे सुंदर चौधरी व संतोष प्रजापती (रा. भिवंडी) हे दोन मित्र व दोन वयस्क महिलाही होत्या. ते सगळे आंघोळीसाठी भातसा नदीत उतरले. मात्र, संदेशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या चौघांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. या वेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. परंतु तो सापडत नसल्याने केडीएमसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्रीपर्यंत त्याचा शोध घेतला जात होता.

Web Title: The young swim in the river Bhatsa in the dam