नवी मुंबईतील कोपरा खाडीमध्ये तरूण वाहून गेला
By Admin | Updated: October 14, 2016 23:26 IST2016-10-14T22:24:34+5:302016-10-14T23:26:40+5:30
सायन - पनवेल महामार्गावर खारघरजवळील कोपरा खाडीमध्ये निर्माल्य टाकत असताना अभिजीत काचरेकर हा तरूण वाहून गेला आहे.

नवी मुंबईतील कोपरा खाडीमध्ये तरूण वाहून गेला
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 14 - सायन - पनवेल महामार्गावर खारघरजवळील कोपरा खाडीमध्ये निर्माल्य टाकत असताना अभिजीत काचरेकर हा तरूण वाहून गेला आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे.
कामोटे येथील सेक्टर नऊ मधील माऊली सोसायटीमध्ये राहणारा अभिजीत काचरेकर हा तरुण आपल्या वडिलांसोबत निर्माल्य पाण्यात टाकण्यासाठी गेला असता कोपरा खाडीच्या पुलावरुन तोल गेल्याने पाण्यात पडला. ही घटना रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी १०० नंबरला कॉल करुन कंट्रोल रुमला कळविले. त्यानंतर कंट्रोल रुमवरुन याविषयी माहिती समजताच पनवेल व सिडकोच्या अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तरूणाचा शोध अद्याप सुरु आहे.