मोबाईलच्या स्फोटात तरुण जखमी
By Admin | Updated: October 14, 2016 21:19 IST2016-10-14T20:48:49+5:302016-10-14T21:19:26+5:30
खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोटामध्ये तरुण जखमी झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील वाशिंद गावात घडली.

मोबाईलच्या स्फोटात तरुण जखमी
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. १४ - खिशात ठेवलेल्या कार्बन मोबाइल हॅण्डसेटचा स्फोट होऊन शहापूर तालुक्यातील वासिंद गावातील करण ठाकरे हा तरुण गुरुवारी गंभीर जखमी झाला आहे. तो मित्रांसोबत दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास गावात फिरत असताना खिशातील मोबाइलचा स्फोट झाल्याने त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मित्रंसोबत असताना त्याला खिशात काही तरी भाजल्याची जाणीव झाली. मित्रंनी पाहिले असता खिशातील कार्बन कंपनीच्या मोबाइलचा स्फोट झाला होता. या झटक्याने तो बेशुद्ध पडला होता. मात्र, मित्रंनी त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याला उपचार मिळू शकले.
स्फोटाच्या भीतीने त्याचा चेहरा पांढरा पडला होता. मोबाइलच्या बॅटरीच्या चिंधडय़ा उडाल्या होत्या. करणच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे कंपनीविरोधात तक्रार करून करणला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. दुसरीकडे याबाबत वासिंद पोलिसांत तक्रार केली असून याबाबत जखमी करणचा जबाब घेऊन पुढील तपास करणार असल्याचे पोलीस अधिकारी अनिल पवार यांनी सांगितले.