जुहूत व्यावसायिकाला घरात घुसून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 02:44 IST2016-04-27T02:44:41+5:302016-04-27T02:44:41+5:30

शस्त्राचा धाक दाखवत एका वित्तपुरवठा व्यावसायिकाच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी जुहू येथे घडली.

The young businessman was robbed and robbed in the house | जुहूत व्यावसायिकाला घरात घुसून लुटले

जुहूत व्यावसायिकाला घरात घुसून लुटले

 मुंबई : शस्त्राचा धाक दाखवत एका वित्तपुरवठा व्यावसायिकाच्या घरातून साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी जुहू येथे घडली. जुहू पोलिसांनी चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अंधेरी पश्चिम येथील टाटा कॉलनी परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास चार अनोळखी इसम बळजबरीने घुसले. या ठिकाणी राहणारे तंबी एस. यांच्या घरात शिरून त्यांनी सोने आणि रोख रक्कम असा साडेचार लाखांचा ऐवज लंपास केला आणि पसार झाले. या प्रकरणी तंबी यांनी जुहू पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे चौघे तंबी यांना ओळखत असल्याचा संशय जुहू पोलिसांना आहे. चार अनोळखी व्यक्तींवर दरोड्याचा गुन्हा दाखल केल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी सांगितले. येथील सीसीटीव्ही फुटेज, तसेच अशाच गुन्ह्यांत सहभागी असलेल्या गुन्हेगारांचीही माहिती मिळविल्याचे जुहू पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The young businessman was robbed and robbed in the house