अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:14 PM2021-03-07T18:14:17+5:302021-03-07T18:15:15+5:30

अकोला शहरातील नमस्ते बिझनेस ऍडव्हायझरी ही कंपनी व कंपनीचे कार्यकारी संचालक गुलशन कृपलानी यांना दिल्लीच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेने इंडियन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित केले आहे.

Young businessman Gulshan Kripalani honored with Indian Achievers Award | अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित

अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित

googlenewsNext

अकोला शहरातील नमस्ते बिझनेस ऍडव्हायझरी ही कंपनी व कंपनीचे कार्यकारी संचालक गुलशन कृपलानी यांना दिल्लीच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेने इंडियन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित केले आहे. प्रोमिसिंग स्टार्टअप या श्रेणी अंतर्गत कृपलानी आणि त्यांच्या कंपनीची निवड करण्यात आली आहे. 2020 या वर्षात देशभरातील रिटेल क्षेत्रातल्या अनेक व्यवसायांना उर्जितावस्था देण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल आणि भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. 

इंडियन अचीवर्स फोरम ही कंपनी मागील 22 वर्षांपासून उद्योग विश्व आणि सामाजिक क्षेत्रातील विविध श्रेणीत भरीव योगदान देणाऱ्या सामाजिक संस्था, उद्योग आणि दोन्ही क्षेत्रात    योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करते. त्याच बरोबर देश-विदेशात दोन्ही क्षेत्रातील विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना घेऊन परिषदांचे तसेच मेळाव्यांचे आयोजन करते.

मागील 22 वर्षात संस्थेने इंडियन ऑइल, फियाट, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, डेल्टा यासारख्या कंपन्यांना तर गौर गोपाल दास यासारख्या प्रशिक्षकांना सन्मानित केले आहे. यंदा कोरोना या आजाराच्या साथीमुळे या पुरस्काराचे वितरण ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. गुलशन कृपलानी आणि त्यांची कंपनी एनबीए यांच्या रूपात अकोला शहराला हा सन्मान प्रथमच प्राप्त झाला आहे.

Web Title: Young businessman Gulshan Kripalani honored with Indian Achievers Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.