शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

'तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा'; एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांमध्ये काय झाली चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:21 IST

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसल्याच्या चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदारांनी भेट घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री पद घेऊन सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली. नेमकी काय चर्चा झाली?

Eknath Shinde Maharashtra News: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबद्दलचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी बुधवारी (४ डिसेंबर) रात्री भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली, याबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माहिती दिली. 

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दीपक केसरकर यांनी शिंदेंसोबतची भेट आणि सरकार स्थापनेबद्दल सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाची, तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदेंकडून अजूनही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. दीपक केसरकर म्हणाले, "बघा याची घोषणा करणे त्यांचा अधिकार आहे. आम्ही सगळे आमदार त्यांना काल (४ डिसेंबर) रात्री भेटलो. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, 'तुम्ही सरकारमध्ये यायला पाहिजे. तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. आम्ही सगळ्यांचे हेच म्हणणे आहे की तुम्ही नसाल, तर आम्ही कोणीही सरकारमध्ये नसू.' त्यांनी याचा सकारात्मक विचार करणार असल्याचे म्हटले आहे."

शिंदे मोदी आणि अमित शाहांचं ऐकतात -केसरकर

दीपक केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे मोदीजी आणि अमित शाह यांचं ऐकतात. त्यांच्याकडून मेसेज आला, तर यात कोणतेही दुमत नाही की, त्यांचे (मोदी-शाह) म्हणणे ते (एकनाथ शिंदे) टाळतील. जसे त्यांचा शपथविधी होता आणि दिल्लीतून फडणवीसांना फोन आला की, तुम्हाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. तर त्यांनीही ते मान्य केलं होतं. तीच परिस्थिती आहे, भलेही आमचे पक्ष वेगळे असतील. आमची तत्वे एक आहेत. आमचा विचार एक आहे. त्यामुळे आमच्यासाठीही मोदीजी आणि अमित शाह हे नेते आहेत", असे दीपक केसरकर म्हणाले. 

"माझ्याकडे अधिकृत माहिती नाहीये. पण, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार काही काळाने होईल. अधिवेशनाआधी व्हायला पाहिजे. कारण त्याची गरज पडते. आपल्याकडे दोन सभागृह आहेत. त्यामुळे पहिला विस्तार अधिवेशनापूर्वी होईल", असे दीपक केसरकर म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेDeepak Kesarkarदीपक केसरकर Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती