शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, अजित पवार काय...", राजू शेट्टींचा संतापाच्या भरात तोल ढासळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:15 IST

Ajit Pawar News: राज्य सरकारवर टीका करताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे बोलताना संतापाच्या भरात संतुलन सुटले आणि त्यांनी एक विधान केले, ज्याची आता चर्चा होत आहे.

Ajit Pawar Latest News: कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने कर्जाची परतफेड करण्यास सांगितले. याच निर्णयावर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांचा कोल्हापूर दौऱ्यातील प्रसंग सांगितला. एसी बंद पडल्यामुळे अजित पवारांना राग आला आणि जिल्हाधिकाऱ्यांवर चिडले, असे शेट्टी म्हणाले. 'एसी बंद पडला म्हणून गड्याला राग आला. काय मेला असता का अजित पवार', असे विधान राजू शेट्टींनी संतापाच्या भरात केले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

काही दिवसांपूर्वी अजित पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी नवीन गाड्यांच्या खरेदीवरून जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टींनी याच गोष्टीवरून अजित पवारांवर टीका केली. 

वाचा >>"जाहीरनाम्यामध्ये सांगितले, पण एकाही भाषणात नाही"; कर्जमाफीवरुन अजितदादांची स्पष्ट भूमिका

राजू शेट्टी म्हणाले, "भीती घालायला सुरूवात करा, त्याशिवाय तुमचा कर्जमाफीचा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही भीती घालायला काही तयारच नाही. मग कसं व्हायचं. तुमच्या कर्जाचे नाव काढले की अजित पवार म्हणतात राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. परवाची गोष्ट सांगतो. अजित पवार हे कोल्हापुरात आले होते. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ३१ मार्चच्या आतमध्ये कर्ज भरा. जसे त्यांनी ७० हजार कोटी हाणलेत, तसे आपणही हाणलेत असं त्यांना वाटतंय", अशी टीका राजू शेट्टी अजित पवारांवर केली. 

'अजित पवार काय मेले असते का?'

अजित पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यातील घटनेबद्दल राजू शेट्टी म्हणाले, "२८ तारखेला कोल्हापूरला आले होते. विमानतळावरून सोळा मिनिटात जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. तेवढ्या काळात सरकारी गाडीचा एसी बंद पडला. गड्याला राग आला. कलेक्टरला म्हणाले, नवी गाडी घ्या. कलेक्टर म्हणाले, मंजुरी घ्यावी लागेल. ते म्हणाले प्रोटोकॉल बाजूला ठेवा आणि मी सांगतोय म्हणून घ्या. काय मेले असते का अजित पवार?', असे विधान राजू शेट्टींनी केलं. 

'बापलेक एकाच दोरीला गळफास घेऊ लागलेत'

"सोळा मिनिटं एसी मिळाला नाही म्हणून उकाड्याने हैराण झालेला माणूस प्रोटोकॉल बाजूला ठेवून नवी गाडी घ्या म्हणून आदेश देतो. अरे दिवसाढवळ्या एकाच दोरीला गळफास घेऊन बाप आणि लेक मरायला लागलेत. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. दया यायला पाहिजे शेतकऱ्यांची, पण त्यांना दया येत नाही. यापेक्षा तुम्हाला राग येत नाही. याचं मला वाईट वाटतं. सोळा मिनिटं एसी बंद पडलेला ह्या गड्याला सहन झाला नाही, मग आमचे शेतकरी आई-बहिणी ४२ डिग्रीमध्ये कशा काम करत असतील? तुम्हाला फक्त १६ मिनिटं एसी बंद पडल्याचा राग आला", अशी टीका राजू शेट्टी यांनी अजित पवारांवर केली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRaju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण