"तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’’ Uddhav Thackeray यांच्यावर Narayan Rane यांचा प्रहार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 09:17 AM2021-10-21T09:17:16+5:302021-10-21T09:18:05+5:30

Narayan Rane Criticize Uddav Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपा नेते आणि शिवसेनेचे कट्टर वैरी नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे.

"You have neither Hindutva nor Dharma! Narayan Rane's attack on Uddhav Thackeray | "तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’’ Uddhav Thackeray यांच्यावर Narayan Rane यांचा प्रहार 

"तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’’ Uddhav Thackeray यांच्यावर Narayan Rane यांचा प्रहार 

Next

मुंबई - नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपावर जोरदार टीका केली होती. तसेच अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशारा दिला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपा नेते आणि शिवसेनेचे कट्टर वैरी नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व आहे, ना धर्म आहे. तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्रिपद, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

आज प्रहारमध्ये हार आणि प्रहार या लेखमालेमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामधून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. त्यात नारायण राणे म्हणतात की, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा वृत्तांत ‘सामना’मध्ये वाचला. मेळाव्यामध्ये जोश आणि दरारा, जो संजय राऊत यांनाच दिसला, तो इतर कोणाला दिसला नाही.  या दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तोंडी ‘नामर्द’, ‘अक्करमाशा’, ‘निर्लज्जपणा’ असे शब्द येतात आणि त्यांची उजळणी ‘सामना’मध्ये होते. याला काय म्हणायचे? ही भाषा आणि संस्कृती महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा, हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवावा.’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा? किती ही बनवाबनवी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!! याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’ कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट ! संजय राऊत बरोबर बोलतात. सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार. सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास केला गेला, असा टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला. 

Web Title: "You have neither Hindutva nor Dharma! Narayan Rane's attack on Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app