शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

मेरे लिए तुम बहुत जरुरी हो; नार्वेकरांची विरोधकांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 08:12 IST

विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहात बाके वाजवून जोरदार स्वागत

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विरोधी पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांची पुन्हा निवड करण्यात आली. दरम्यान, उद्धवसेनेच्या आमदारांनी या निवडीवर बहिष्कार टाकला.  

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अध्यक्ष निवडीचा मांडलेला प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी घोषित करताच विधानसभेत ‘जय भवानी, जय शिवाजी...’ अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांनी सभागृह दणाणून सोडले. 

Ūīविधानसभेचे कामकाज सुरू होताच हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रस्ताव मांडला. अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील, भाजपचे आशिष शेलार आणि चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. हंगामी अध्यक्षांनी हा प्रस्ताव मतास टाकला असता आवाजी मतदानाने सभागृहाने एकमताने मंजूर केला. प्रस्ताव मंजूर होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी करताच सभागृहातील सत्ताधारी व विरोधी बाकावरील सदस्यांनी बाके वाजवून  निवडीचे स्वागत केले.

कोळंबकर यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवार, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस नेते नाना पटोले, नितीन राऊत, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी नार्वेकर यांना अध्यक्षस्थानी आसनस्थ करत त्यांना शुभेच्छा दिल्या. हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनीही शुभेच्छा दिल्या. 

त्यांची अनुपस्थिती  अस्वस्थ करणारीमुंबई : “तुम पर कोई जबरदस्ती नहीकी तुम मेरी सारी बाते मानो...मुझे सिर्फ इतना पता है की,मेरे लिए तुम बहुत जरुरी होहा शेर ऐकवत विधानसभाध्यक्षपदी पुन्हा निवड झालेले ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना भावनिक आवाहन केले.  सभागृहाच्या कामकाजात मला दोन्ही बाजूंचे सहकार्य आवश्यक आणि तितकेच मोलाचे आहे. १५ व्या विधानसभेच्या आरंभदिनी विरोधी बाकांवरील अनुपस्थिती मला अस्वस्थ करून गेली. असे चित्र यापुढे दिसायला नको, असे म्हणत त्यांनी हा शेर ऐकविला. 

 दोन्ही बाजूंचे आभार मानून त्यांनी विधानसभेत आपण दोन्ही बाजूंना न्याय देऊ असे आश्वासन दिले. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे जनतेच्या इच्छा आकांक्षाची पूर्तता व्हवी यासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरvidhan sabhaविधानसभाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४