शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 19:10 IST

"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.''

मुंबई:केंद्र सरकारच्या नवीन 'अग्निपथ योजने'ला देशभरात विरोध होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लोकमतशी खाच बाचतीत केली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

'सैन्यात भरती होणे अतिशय अवघड'जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आजपर्यंत आपण देशात काँट्रॅक्ट किलर्स शब्द ऐकला होता, पण आता नवीन शब्द येतोय, काँट्रॅक्ट सोल्जर्स. सैन्यात भरती होणे अनेकांचे स्वप्न असते. निधड्या छातीचे पोरं सैन्यात जातात. निधड्या छातीने गोळ्या झेलून देशातील बांधवाना  सुरक्षित ठेवतात. त्यांची मानसिक आणि शारिरीक अवस्थात सुदृध असते, म्हणून त्यांना सैन्यात जागा मिळते. अतिशय अवघड प्रक्रियेतून हे पोरं जातात आणि त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळते. अशाच पोरांनी भारताचा इतिहास रचलाय."

काँट्रॅक्टवर घेतलेली पोरं काम करतील?"भारताचे सैनिक पाकिस्तान, चीन, बाँग्लादेश सीमेवर तैनात असतात. हे सैनिक मायनस तापमानात काम करतात. इशान्येकडे असलेल्या घनदाड जंगलातून परदेशी घुसत असतात, तिकहे आपले सैनिक काम करतात. काश्मीरकडे पाकिस्तान, वर अफगाणिस्तान, इशान्येकडे चीन, बांग्लादेश, या देशांच्या सीमा लागल्या आहेत. सीलाँग चीनने ताब्यात घेतले आहे. अशा परिस्थितीत काँट्रॅक्टची पोर काम करू शकतील?," असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

'तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करताय'यावेळी आव्हाडांनी केंद्रावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "या पोरांना सहा महिन्यात तयार केले जाणार आहे. त्यांना तुम्ही शस्त्र चालवणे शिकवणार, आधुनिक तंत्रज्ञान असलेली हत्यारे चालवायला देणार. एकप्रकारे तुम्ही ग्राउंड आर्मी तयार करत आहात. हे कोणाच्या कामी येईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. ज्याप्रकारे गोरक्षक दल काम करते, त्याप्रमाणेच यांना पोरांना कामाला लावले जाईल," असा आरोप त्यांनी केला.

'...तर नोकऱ्या देऊ नका'"ज्या वयात पोरांनी अभ्यास केला पाहिजे, त्या वयात ही पोर आर्मीतून निवृत्त होणार. चार वर्षानंतर पोरांनी काय करायचं? देशातील तरुणांची चेष्टा करू नका. नोकरी देता येत नसेल, तर देऊ नका पण बेरोजगारांची टिंगल थांबवा. या योजनेमुळे मुलांचे भविष्यच राहिले नाही. केंद्राला आता सैन्य आता ओझ वाटायला लागलंय," असंही ते म्हणाले.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाJitendra Awhadजितेंद्र आव्हाडDefenceसंरक्षण विभागCentral Governmentकेंद्र सरकार