विनयभंग प्रकरणी योगगुरूला अटक
By Admin | Updated: July 10, 2017 05:12 IST2017-07-10T05:12:08+5:302017-07-10T05:12:08+5:30
योगासने शिकविण्याच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करण्याची घटना रविवारी सकाळी शिवडी येथील एका योगासनाच्या शिबिरात घडली.

विनयभंग प्रकरणी योगगुरूला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : योगासने शिकविण्याच्या बहाण्याने एका तरुणीचा विनयभंग करण्याची घटना रविवारी सकाळी शिवडी येथील एका योगासनाच्या शिबिरात घडली. या प्रकरणी शिवम योगा अकादमीचा प्रमुख शिवराम राऊतला शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. या कृत्याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शिवडीतील महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात दर रविवारी योगासनाचे वर्ग घेतले जातात. त्यासाठी परिसरातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने जमतात. योगासने शिकवताना तो एका महिलेला करीत असलेला स्पर्श जाणीवपूर्वक करत असल्याचे संबंधित महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यांनी त्याबाबत वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शिवराम राऊतला शनिवारी रात्री अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. राऊतबाबत अन्य कोणाची अशा प्रकारची तक्रार असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.