येरवडा जेलमध्ये कैद्याची डोक्यात दगड घालून हत्या

By Admin | Updated: July 8, 2017 13:33 IST2017-07-08T13:23:29+5:302017-07-08T13:33:49+5:30

येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

In Yerawada prison, the prisoner's head was stoned and murdered | येरवडा जेलमध्ये कैद्याची डोक्यात दगड घालून हत्या

येरवडा जेलमध्ये कैद्याची डोक्यात दगड घालून हत्या

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 8 -  येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (8 जुलै ) दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक व गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणीयेरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करत होते. त्यांच्यामध्ये काही क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. यावेळी एका कैद्यानं दुस-याचे लक्ष नसताना  पाठीमागून दगडाने हल्ला करुन त्याची हत्या केली.  
 
आरोपीचे नाव दिनशे दबडे (वय 35 वर्ष) असे असून तो हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.  तर  सुखदेव मेघराज महापूर (वय 43 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला साडेतीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या 7 महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी व हत्या करण्यात आलेला कैदी दोघेही एकाच बराकीमध्ये राहत होते.  
 
कारागृह प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती कळवल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.  
 
आणखी बातम्या वाचा
(बुरहान वानीला ठार मारल्याला झालं एक वर्ष, काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी)
(इस्लाम स्वीकारलेल्या हिंदूस अमेरिकेत अटक, दहशतवादाला होता पाठिंबा)
(मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवाशाला लुटून केली बेदम मारहाण)
 

 

Web Title: In Yerawada prison, the prisoner's head was stoned and murdered