जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय..खंडेरायाच्या जेजुरी गडावर राज्यभरातून आलेल्या एक लाखांवर भाविकांनी गर्दी केली होती.येळकोट येळकोट जयमल्हार च्या गजरात कुलदैवताचे दर्शन घेतले. वांग्याचे भरीत, कांद्याची पात, आणि रोडग्याच्या महाप्रसादाने चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या खंडेरायाच्या षडरात्र उत्सवात घटस्थापना, होमहवन, यज्ञयाग, धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रमांसह भाविकभक्तांसाठी विविध मिष्टान्न महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये किमान एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला शिवशंकरांनी मार्तंडभैरवाचा अवतार धारण करून ऋषी -मुनी आणि देव गणांचा छळ करणार्या मणी -मल्ल दैत्यांचा संहार केला हे युद्ध सहा दिवस चालले. म्हणून हा उत्सव सहा दिवस चालतो याला षडरात्र उत्सव देखील म्हणतात. तसेच आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी असे ही सबोधले जाते. या नवमीपसून खंडोबा भक्त चातुर्मास पाळतात, या काळात कांदा, वांगे खान्यातून वर्ज केले जाते, मात्र कुलदैवत खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सवाला कुलदैवताला भरीत रोडग्याचा नैवद्य अर्पण करून कांदा-वांगे खाण्यास सुरुवात होते. म्हणून या उत्सवाला "वांगेसट" असे ही म्हणतात.
येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 19:55 IST
कुलदैवत खंडेरायाच्या जत्रा -यात्रा उत्सवातील महत्वपूर्ण उत्सव म्हणजे चंपाषष्ठी उत्सव होय...
येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजरात लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
ठळक मुद्देराज्यातुन आलेल्या भाविक भक्तांनी देवदर्शन,दिवटी पाजळून तळीभंडार, आदी केले धार्मिक विधी गडकोट आवारात कांद्याची पात, वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, आदी महाप्रसादाचे आयोजन सहा दिवसांच्या काळात भाविकभक्तांच्या वतीने मुख्य मंदीरात फुलांची आकर्षक सजावट