शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमधील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा ' लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 17:29 IST

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीदिनी म्हणजेच १ ऑगस्टला दरवर्षी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी दिला जातो पुरस्कार.

ठळक मुद्देएक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप

पुणे: विद्यार्थ्यांमधील निर्मितीशीलतेला प्रोत्साहन देऊन कर्तृत्ववान युवापिढी घडविणारे, लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीचा पुरस्कार व प्रसार करणारे आणि शिक्षणात गुणात्मक बदल करणारे लडाखमधील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना यंदाचा ' लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' जाहीर झाला आहे.      लडाख सीमेवरील अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी उत्पादननिर्मितीसाठी भारताला ' आत्मनिर्भर' बनविण्याचा नारा दिला जात असताना सोनम वांगचुक यांनी स्वदेशीचा पुरस्कार हेच चीनच्या आव्हानाला खरे उत्तर ठरेल अशी ठाम भूमिका मांडली. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग हे जगासाठी प्रेरणादायक ठरले.

शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने यंदा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी सोनम वांगचुक यांची निवड करण्यात आली आहे. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे , येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता होत असून, या पार्श्वभूमीवर वांगचुक यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे यंदाचे 37 वे वर्ष आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दीपक टिळक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ रोहित टिळक उपस्थित होते.      लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिरामध्ये होणार्‍या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार होते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही. मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल असे त्यांनी सांगितले. ...........लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आम्ही खूप कार्यक्रमांचे नियोजन केले होते. मात्र कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. दि.१ व २ ऑगस्टला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या लोकमान्य रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने ' युगपुरुष' नावाची व्याख्यानमाला वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. यात लोकमान्य टिळक यांचे विविध पैलू उलगडणारी मान्यवरांची व्याख्याने होणार असून, लोकमान्य टिळक यांच्यावरील छोटी फिल्म दाखवली जाईल. तसेच एक  विशेषांकही काढण्यात येणार असल्याचे डॉ दीपक टिळक यांनी सांगितले..…..  

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकEducationशिक्षणResearchसंशोधन