यंदाही चिमुकल्यांचे पुष्पाने होणार स्वागत

By Admin | Updated: June 12, 2014 20:52 IST2014-06-12T20:47:51+5:302014-06-12T20:52:14+5:30

पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे दरवर्षाप्रमाणे यंदाही गुलाबपुष्पाने स्वागत केले जाणार असून, मिष्टान्नासह पुस्तकांचा मोफत संचही दिला जाणार आहे.

This year, there will be floral floral accolades | यंदाही चिमुकल्यांचे पुष्पाने होणार स्वागत

यंदाही चिमुकल्यांचे पुष्पाने होणार स्वागत

बुलडाणा : उन्हाळी सुट्टीनंतर २६ जून रोजी शाळेची घंटा वाजणार आहे. पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे दरवर्षाप्रमाणे यंदाही गुलाबपुष्पाने स्वागत केले जाणार असून, मिष्टान्नासह पुस्तकांचा मोफत संचही दिला जाणार आहे. त्याबाबतचे आदेश शासनाने संबंधित शाळा प्रशासनाला दिले आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश म्हणजे शिक्षण क्षेत्राचे जणू नववर्षच असते. विद्यार्थ्यांची शाळेप्रति गोडी वाढावी, या दृष्टीने दरवर्षी शिक्षण विभागातर्फे उपाय सुचविले जातात. यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. याबाबत शालेय प्रशासनाला विविध सूचना देण्यात आल्या असून, शाळा सुरू होण्याच्या पूर्वी शिक्षकांनी ध्वनीक्षेपकावरुन २६ जून रोजी शाळा सुरू होण्याबाबत जनजागृती करावी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत एक दिवस आधी पालकांच्या भेटी घेऊन त्यांना शाळा सुरू होत असल्याबाबत जनजागृती करावी, तसेच यावेळी प्रवेशपात्र बालकांचा अर्ज तेथेच भरावा. गावातील नागरिक व युवक मंडळाच्या सहकार्याने शाळा परिसर स्वच्छ व झाडून सडा-रांगोळी काढावी तसेच पानांची व उपलब्ध फुलांची तोरणे बांधने अभिप्रेत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रभातफेरी काढून त्यात शिक्षकांना सहभागी होण्याचे आदेश आहेत.

Web Title: This year, there will be floral floral accolades