शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
3
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
4
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
7
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
8
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
9
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
10
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
11
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
12
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
13
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
14
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
15
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
16
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
17
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
18
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
19
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
20
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"

शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी यशवंत सिन्हांचे प्रयत्न; उद्धव ठाकरेंशी बोलणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 8:15 AM

विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा कायम राहावा, यासाठी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा प्रयत्न करीत आहेत. यासाठी ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्याची विनंती करणार आहेत.

विरोधकांच्या संयुक्त उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका शिवसेनेने स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जूनला दिल्लीत आयोजित केलेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर स्थिती बदलली आहे. शिवसेनेचे विधानसभेत ५५ सदस्य आहेत. त्यापैकी ४० जण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळे झाले आहेत. यामुळे या आमदारांची मते यशवंत सिन्हा यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार व राज्यसभेत ३ खासदार आहेत. या २२ खासदारांचे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एकूण मूल्य १५ हजार ४०० एवढे आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचे मूल्य १७५ एवढे निश्चित केले आहे. यामुळे शिवसेनेकडे असलेल्या एकूण ५५ आमदारांचे मूल्य ९,६२५ एवढे आहे. शिवसेनेच्या बंडखोर ४० आमदारांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्यास शिवसेनेकडून सिन्हा यांना १५ आमदारांकडून केवळ २,६२५ मूल्यांची मते मिळू शकतील.  

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाUddhav Thackerayउद्धव ठाकरे