येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 4, 2014 22:41 IST2014-06-04T20:33:30+5:302014-06-04T22:41:47+5:30

डॉक्टरकीचा व्यवसाय थाटणा-या बोगस डॉक्टरच्या मुसक्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवळल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे.

Yardwadi bogus doctor filed a complaint | येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

येरवडयातील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

पुणे : संगणक शास्त्राची पदवी घेऊन डॉक्टरकीचा व्यवसाय थाटणा-या बोगस डॉक्टरच्या मुसक्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने आवळल्या आहेत. आरोग्य विभागाकडून शहरात बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सुरू आहे. या तपासणी अंतर्गत या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. सरोज सुनिलकुमार पुनावासिराम असे या डॉक्टरचे नाव असून येरवडा येथील जीजामात नगर मध्ये सरोज क्लीनिक या नावाने हा डॉक्टर गेल्या वर्षभरापासून हे क्लिनिक चालवित असल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी परदेशी यांनी दिली.
महापालिकेकडून शहरातील बोगस डॉक्टरांच्या तपासणीची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अंतर्गत या समितीने केलेल्या तापसणीत या डॉक्टराने पालिकेकडे सादर केलेली कागदपत्रे बोगस आढळून आली. त्यानंतर आज दुपारी 12 च्या सुमारास आरोग्य विभागाच्या या समितीने सरोज क्लिनिकवर धाड घातली. यावेळी हा डॉक्टर रूग्णांची तपासणी करीत होता. यावेळी समितीने त्याच्याकडे असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली असता, या डॉक्टरने महाराष्ट्र मेडीकल कैन्सिलचे प्रमाणपत्र या समितीस दाखविले. मात्र, त्यावर या डॉक्टरचे नाव आणि त्याचा नोंदणी क्रमांक हाताने लिहल्याचे आढळून आले. या क्रमांकाची तपासणी या पथकाने कैन्सिलच्या संकेतस्थळावर केली असता, हा नोंदणी क्रमांक दुस-या एका डॉक्टरचे असल्याचे दिसून आले. तसेच पुनावासियाला आपल्या पदवीबाबत इतर कोणतीही माहिती देता आली नाही. त्यानंतर तत्काळ या डॉक्टवर कारवाई करण्यात आली. तसेच त्याच्यावर बोगस डॉक्टर एमएमपी अँक्ट 33/1,2 नुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. परदेशी यांनी सांगितले. तसेच या बोगस डॉक्टरचे ब़ँचलर ऑफ कॉम्प्युटर अँप्लीकेशनचे शिक्षणही घेतले असल्याचे ते म्हणाले. महापालिकेचे अन्न निरिक्षक पी.के कोहकडे, पी.पी निम्हण, आरोग्य निरिक्षक क्षितिज कोंढरे, डॉ. रेखा गलांडे, यांच्या पथकाने सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.

Web Title: Yardwadi bogus doctor filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.