शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनात लेखकांना मिळणार ‘मानाचं पान’; विविध साहित्य प्रकारांतील ५० पुस्तकांचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 07:23 IST

तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार

स्वप्नील कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वत:चे पुस्तक प्रकाशित व्हावे, ही प्रत्येक लेखकाची इच्छा असते. मात्र, ते जर साहित्य संमेलनात प्रकाशित झाले, तर तो त्या लेखकासाठी अविस्मरणीय क्षण ठरतो. पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांना ‘मानाचे पान’ मिळणार असून, तब्बल ५० लेखकांची विविध साहित्य प्रकारातील पुस्तके संमेलनादरम्यान प्रकाशित करण्यात येणार आहेत.

हा दुग्धशर्करा योग जुळून आणलाय संमेलनाची आयोजक संस्था ‘सरहद’ने. याबद्दल माहिती देताना साहित्य संमेलन आयोजक संस्था ‘सरहद’चे प्रमुख संजय नहार यांनी सांगितले की, दिल्लीतील साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्यासाठी आमच्याकडे इतर प्रकाशकांकडून २५ आणि ‘चपराक’ प्रकाशनाचे २५ असे ५० प्रस्ताव आले आहेत. संमेलनामध्ये एका पुस्तक प्रकाशन  कट्ट्याचे नियोजन करण्यात येणार आहे. संमेलनादरम्यान तीन दिवस प्रत्येक लेखकाला ठराविक वेळ देत प्रकाशन कट्ट्यावर बोलावून मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

विषयांचे वैविध्य हेच वैशिष्ट्य

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होणं, हा लेखकांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सन्मान असतो. या पुस्तकांमध्ये विषयांची वैविध्यता आहे. मराठी भाषेतील वैविध्य भारतासमोर दाखवण्याची ही संधी आहे. यामुळे नवीन लेखकांची आणि विषयांची यानिमित्ताने ओळख होईल.

‘चपराक’ने वैविध्यपूर्ण विषय आणि पुस्तके निवडली आहेत. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची नाटकावरील तीन महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करणार आहोत. कवी अनंतराव घोगले यांचा  मोडी आणि मराठीमधील कवितांचा पहिला द्विभाषिक कवितासंग्रह आहे. सुहास कोळेकर, संदीप वाकचौरे, जे. डी. पराडकर, चंद्रलेखा बेलसरे, जनार्दन देवरे, हिरालाल पगडाल आदींची प्रवासवर्णने, कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य आदी पुस्तके प्रकाशित होणार आहेत.- घनश्याम पाटील, संपादक, चपराक, पुणे

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळPuneपुणे