शाहरूखच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, 'रईस'ला आता सेनेचा विरोध

By Admin | Updated: January 19, 2017 07:43 IST2017-01-19T07:40:56+5:302017-01-19T07:43:06+5:30

शाहरुखच्या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार माहिरा खानची प्रमुख भूमिका असून याच मुद्यावरून शिवसेनेने चित्रपट प्रदर्शित करण्यास विरोध दर्शवला आहे.

The worst thing to happen to Shah Rukh, the 'Rais' is now against the army | शाहरूखच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, 'रईस'ला आता सेनेचा विरोध

शाहरूखच्या मागचं शुक्लकाष्ठ संपेना, 'रईस'ला आता सेनेचा विरोध

>ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि.19 - अभिनेता शाहरूख खानचा आगामी बहुचर्चित रईस हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असला तरी या चित्रपटाच्या मागचं शुक्लकाष्ठ अद्याप संपलेलं नाही. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान शाहरूखसोबत या चित्रपटात झळकणार असून याच मुद्यावरून शिवसेनेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे. 
कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस व मल्टीप्लेक्सच्या अधिका-यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत निवेदन दिले आहे. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यास सेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
येत्या 25 जानेवारी रोजी ‘रईस’ देशभर प्रदर्शित होणार आहे. पाकिस्तानी कलाकारांना होणा-या विरोधाच्या पार्श्वभूमीवर  सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी शाहरुखने यापूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. 
पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसेचा सूर मावळला असला तरीही आता शिवसेनेने या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. 

Web Title: The worst thing to happen to Shah Rukh, the 'Rais' is now against the army