शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

चिंतेत भर! राज्यात कोरोनाचे पावणेतीन लाख सक्रिय रुग्ण, दिवसभरात ३९१ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 03:38 IST

दिवसभरात १३,४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुणे आघाडीवर असून, त्याखालोखाल मुंबई, ठाणे आणि नागपूर हे जिल्हे आहेत.

मुंबई : राज्यात दिवसभरात २२ हजार ८४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ३९१ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ झाली असून, मृतांचा आकडा २९ हजार ११५ एवढा आहे. राज्यात सध्या तब्बल २ लाख ७९ हजार ७६८ सक्रिय रुणांवर उपचार सुरू आहेत.दिवसभरात १३,४९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत पुणे आघाडीवर असून, त्याखालोखाल मुंबई, ठाणे आणि नागपूर हे जिल्हे आहेत.राज्यात ग्रामीण भागात दिवसागणिक झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे यंत्रणांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.२ टक्क्यांवर आले असून, मृत्युदर २.८१ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३९१ मृत्यूंमध्ये मुंबई ४२, ठाणे ४, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा १, भिंवडी-निजामपूर मनपा १, मीरा- भार्इंदर मनपा १, पालघर ४, वसई-विरार मनपा ५, रायगड ९, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा ३, अहमदनगर १४, अहमदनगर मनपा ३, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदुरबार २, पुणे २०, पुणे मनपा २५, पिंपरी-चिंचवड मनपा १६, सोलापूर १९, सोलापूर मनपा ३, सातारा १८, कोल्हापूर १४, कोल्हापूर मनपा ९, सांगली २२, सांगली-मिरज- कुपवाड मनपा ९, सिंधुदुर्ग ७, रत्नागिरी २, औरंगाबाद ८, औरंगाबाद मनपा ४, परभणी ४, परभणी मनपा २, लातूर ३, लातूर मनपा २, उस्मानाबाद ४, बीड २, नांदेड १०, नांदेड मनपा ६, अकोला २, अकोला मनपा ३, अमरावती ५, अमरावती मनपा ३, यवतमाळ ४, वाशिम २, नागूपर १०, नागपूर मनपा ३०, भंडारा १, गोंदिया १, गडचिरोली १ आणि अन्य राज्य/देशातील ३ रुग्णांचा समावेश आहे.पुण्यात ७५ हजार ६१० सक्रिय रुग्ण असून, ही देशभरातील सर्वाधिक नोंद आहे. राज्यात त्याखालोखाल मुंबईत २९ हजार, ठाण्यात २८ हजार ७६८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मुंबईत रुग्णदुपटीचा काळ ५८ दिवसांवरमुंबईत रुग्ण दुपटीचा दर ५८ दिवसांवर आला आहे. शनिवारी २,३५० रुग्णांचे निदान झाले असून, ४२ मृत्यू झाले. परिणामी, एकूण बाधितांची संख्या १ लाख ६७ हजार ६५६ रुग्ण असून, मृतांचा आकडा ८,१०९ आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. १ लाख ३० हजार १६ जण बरे झाले असून २९,१७६ सक्रिय रुग्ण आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस