शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागातील पेरण्या खोळंबल्या, केवळ १५.१४ टक्के पेरण्या झाल्याने चिंता

By admin | Updated: July 2, 2016 20:33 IST

जून महिना उलटूनसुद्धा नागपूर विभागात अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे संपूर्ण विभागातील पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत केवळ १५.१४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत

ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 02 - जून महिना उलटूनसुद्धा नागपूर विभागात अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस पडलेला नाही. यामुळे संपूर्ण विभागातील पेरण्या खोळंबल्या असून, आतापर्यंत केवळ १५.१४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. यामुळे शेतक-यांसह कृषी विभागाची चिंता वाढली आहे. 
 
यातच मागील आठवडाभरापासून पुन्हा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांनी पेरणी केली, त्यांचाही जीव टांगणीला लागला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार नागपूर विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यात लागवडीखाली एकूण १९ लाख १० हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र त्यापैकी केवळ २ लाख ८९ हजार २०० हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाली आहे. शिवाय यात नागपूर जिल्ह्यातील १७ टक्के पेरणीचा वाटा आहे. 
 
हवामान विभागाच्या मते, जून महिन्यात नागपूर विभागात सरासरी १६०.६ मिमी. पाऊस पडतो. मात्र यावर्षी केवळ १३२.६ मिमी. (७०.७ टक्के) पाऊस पडला आहे. पावसाची ही टक्केवारी जिल्हानिहाय पाहता नागपूर जिल्ह्यात ५६.३ टक्के, वर्धा जिल्ह्यात ८३.३ टक्के, भंडारा ४१.४ टक्के, गोंदिया ४७.६ टक्के, चंद्रपूर ८८.९ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील वर्धा येथे २७ टक्के आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १८ टक्के पेरण्या आटोपल्या असून, नागपूर जिल्ह्या हा १७ टक्क्यांसह तिसºया क्रमांकावर आहे. याशिवाय भंडारा येथे १ टक्का, गोंदिया ३ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ४ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. 
 
नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यासाठी ४ लाख ८४ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील पीक लागवडीचे नियोजन केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८३ हजार ५९८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. याचा तालुकानिहाय विचार करता, नागपूर ग्रामीणमध्ये १८.५० टक्के, कामठी ०.५७ टक्के, हिंगणा २८.५७ टक्के, रामटेक ०० टक्के, पारशिवनी  १९.९३ टक्के, मौदा ०.९३ टक्के, काटोल १९.५८ टक्के, नरखेड ५.९१ टक्के, सावनेर ७०.७४ टक्के, कळमेश्वर ३४.७६ टक्के, उमरेड १४.४४ टक्के, भिवापूर १.०५ टक्के व कुही येथे ०.२ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कापसाचे १ लाख ९६ हजार ९७० हेक्टर अपेक्षित लागवड क्षेत्र असून आतापार्यंत त्यापैकी ६१ हजार ४२८ हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. शिवाय ८ हजार ४५९ हेक्टरवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.