शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील मागास प्रवर्गातील कर्मचारी, अधिकारी पदोन्नतीवरून चिंतेत, आरक्षणनिहाय पदोन्नतीवर १३ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 16:55 IST

भाईंदर - मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याचा निर्णय ४ आॅगस्टला दिल्यानंतर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

राजू काळेभाईंदर - मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याचा निर्णय ४ आॅगस्टला दिल्यानंतर त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर १३ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी पार पडणार असून, त्याकडे आरक्षणनिहाय पदोन्नती मिळालेल्यांचे डोळे लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णय मान्य केल्यास सर्व प्रशासकीय कार्यालयांसह मीरा-भार्इंदर महापालिकेत देखील २००४ पासून अद्यापपर्यंत आरक्षणनिहाय दिलेली पदोन्नती बेकायदेशीर ठरणार आहे. त्याचा फटका पालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याने सध्या ते चिंताग्रस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांना जातीय निकषावर सरकारी तथा निमसरकारी सेवेत आरक्षण दिले जात असल्याने मागासर्वीयांना नोकरीत प्राधान्य दिले जाते. त्यानंतर त्यांना जातीय निकषावरच पदोन्नतीदेखील दिली जाते. यामुळे इतर वर्गातील कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका क्रमांक २७९७ दाखल करण्यात आली. न्यायालयाने दाखल याचिकेवर ४ आॅगस्टला पार पडलेल्या सुनावणीत २५ मे २००४ रोजीचा सरकारी नोकरीतील मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा सरकारी निर्णय रद्द ठरविला. तसेच पुढील सरकारी निर्णयासाठी चार आठवड्यांची स्थगिती आदेशही दिला. राज्य सरकारने न्यायालयाच्या स्थगिती कालावधीत १८ आॅक्टोबरला काढलेल्या परिपत्रकानुसार आरक्षणनिहाय पदोन्नती देण्याचा आदेश काढला. यानंतर उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश २७ आॅक्टोबरला संपुष्टात आला. दरम्यान सरकारी आदेशाला जारी झाल्याने त्याला स्थगिती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका क्रमांक २८३०६/१७ दाखल करण्यात आली. त्यावर ३० आॅक्टोबरला पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाच्या ४ आॅगस्टच्या निर्णयास स्थगिती न देता परिस्थिती जैसे थे ठेवण्याबाबत कोणतेही आदेश न दिल्याने सरकारी निर्णय २५ मे २००४ मधील तरतुदीनुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.तसेच यावर १३ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी घेण्याचे आदेश दिल्याने सर्व स्तरावरील पदोन्नती प्रक्रीया स्थगित ठेवण्याचे तसेच पदोन्नती संदर्भात कोणतेही आदेश न काढण्याची दक्षता सर्व सरकारी विभागांनी व त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयांनी, आस्थापना अधिका-यांनी घ्यावी, असा सूचनावजा सावधानतेचा इशारा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाने २ नोव्हेंबरला काढलेल्या पत्रकात दिला आहे. यावर १३ नोव्हेंबरला पार पडणा-या सुनावणीनंतर अधिक माहिती देण्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केल्यास २५ मे २००४ नंतर मागासवर्गीयनिहाय पदोन्नती मिळालेल्यांवर गडांतर येणार आहे. त्याचा फटका सर्व सरकारी, निमसरकारी तसेच स्थानिक प्रशासनातील मागासवर्गीयनिहाय पदोन्नती मिळालेल्यांना बसणार असुन मीरा-भार्इंदर महापालिकेतील काही मागासवर्गीय वरीष्ठ अधिकाऱ्यांना थेट कनिष्ठ पदावर काम करावे लागणार आहे. यामुळे पालिकेतील त्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असले तरी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यासाठी आयुक्त व राज्य सरकार कोणते नवीन निकष अंमलात आणणार का, याची प्रतीक्षा मात्र त्या अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे.

टॅग्स :Courtन्यायालयMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक