शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक इंटरनेट दिन : पुणेकर ठरत आहेत सर्वाधिक सायबर क्राईमचे बळी, वाचा धक्कादायक आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:52 IST

दिवसेंदिवस ग्लोबल होत चाललेल्या पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असून हे प्रमाण तिपटीने वाढले आहे.

पुणे :दिवसेंदिवस ग्लोबल होत चाललेल्या पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असून हे प्रमाण तिपटीने वाढले आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. 

  • सायबर क्रॉईम विभागाकडे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत असे गुन्हे घडल्याचे तब्बल २ हजार ७९९ अर्ज आले असून त्यातील सर्वाधिक २ हजार १०८ तक्रारी डेबीट, क्रेडीट आणि एटीएम कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आहेत. या तक्रारींची सरासरी पाहिली असता शहरात दररोज १५ अर्ज दाखल होत आहेत.  
  •  तुमच्या एटीएम कार्डची वैधता संपली असून नवीन कार्डसाठी सीव्हीव्ही नंबर आणि त्यानंतर आलेला ओटीपी सेंड करा, असे फोन विविध प्रकारचे कार्ड वापरणा-यांना येतात. फोनवर सांगितल्याप्रमाणे वापरकर्त्यांने सीव्हीव्ही आणि ओटीपी सांगितला की, त्यांच्या खात्यातून काही रक्कम कमी झाल्याचे प्रकार सध्या सर्रास घडत आहेत. तसेच फेसबुकच्या माध्यमातून परदेशी व्यक्तीबरोबर प्रेम संबंध निर्माण होतात. काही दिवसांनी परदेशी व्यक्ती महागडे गिफ्ट पाठवते. मात्र ते विमानतळावर किंवा आयकर विभागाकडे अडकले असून ते सोडविण्याचा बाहणा करून लाखो रुपये उकळले जातात. 
  •  सायबर क्रॉईम हे केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित नसून सोशल माध्यमातून बदनामी, हॅकींग आणि डाटा चोरी असे गुन्हे देखील या माध्यमातून केले जात आहेत. फेसबूकच्या माध्यमातून बदनामी केल्याचे, विविध पोस्ट आणि अश्लील फोटो टाकल्याचे गेल्या अडीच वर्षात १ हजार २७६ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. 

 

    व्हॉटसअ‍ॅपच्यामाध्यमातून  २२५ गुन्हे 

  • व्हॉटसअ‍ॅप म्हणजे आजच्या तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे.  बदलत्या जीवनशैलीनुसार हे माध्यम आवश्यक असले तरी त्याचा प्रत्येकवेळी चांगल्याच कामासाठी वापर होते असे नाही. व्हॉटअ‍ॅपच्यामाध्यमातून बदनामी, अश्लील फोटो टाकणे आणि कमेंट केल्याप्रकरणी अडीच वर्षांत २२५ गुन्हे घडले आहेत.  

 

    गुन्हयांमध्ये तिप्पटीने वाढ 

  • २०१६ सालापर्यंत सायबर क्रॉईमची संख्या मर्यादित होती. त्यावर्षी शहरात २ हजार ७९ प्रकार घडले होते. मात्र २०१७ मध्ये या प्रकारांत तीप्पट वाढ होत हा आकडा ५ हजार ७४१ वर पोहचला आहे 
  • मागील दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी देखील त्यात वाढच झाल्याचे दिसते. २०१६ साली आर्थिक फसवणुकीचे १ हजार १६७ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ साली २ हजार ७९ तर २०१७ साली ५ हजार ७४१ तक्रार अर्ज दाखल झाले आहे.   तर २०१७ मध्ये ही संख्या ४ हजार ३२० झाली होती. 
टॅग्स :PuneपुणेInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम