शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

World Food Day : त्यांचं पोट भरलं की 'तिचं' मन भरतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 22:11 IST

तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने  अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास. 

पुणे : ती खरं तर लहानग्या 'स्वरूप'ची आई. चारचौघींप्रमाणे आपल्या बाळाच्या भविष्याची स्वप्न बघणारी. पण नियतीच्या मनातलं कोणीही ओळखू शकत नाही. तिच्याही आयुष्यात आनंदाचा झरा बनून आलेल्या 'स्वरूप'ने  अवघ्या सातव्या वर्षी एक्झिट घेतली आणि जणू काही काळ तिचं आयुष्यच थांबलं. पण ती हरली नाही, खचली नाही. तिने तिच्या आयुष्यालाच निःस्वार्थी स्वरूप दिलं आणि सुरु झाला नवा प्रवास. 

           चिंचवड येथे राहणाऱ्या विद्या जितेंद्र जोशी यांची ही कहाणी. सध्या त्या चिंचवड येथे स्वतःचा व्यवसाय करतात.एका दुःखद क्षणी त्यांचा मुलगा स्वरूपचे निधन झाले. त्यातून त्या हळूहळू सावरल्या आणि स्वराली, स्वरदाप्रमाणे अनेकांच्या आई झाल्या. मुलाच्या आजारपणामुळे त्यांना अनेकदा महिनोंमहिने रुग्णालयात मुक्काम करावा लागला.अगदी तो लहान असल्यापासून सुमारे पाच ते सहा वर्ष रुग्णालय त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले होते. त्याच्या जाण्यानंतर त्यांनी रुग्णांसाठी काम करण्याचा निश्चय केला.

            सध्या त्या चिंचवड परिसरातील रुग्णांना कोणतेही शुल्क न आकारता जेवणाचे डबे देतात. फक्त रुग्णचं नाही तर त्याच्यासोबत राहून शारीरिक आणि मानसिकदृष्टया थकून जाणाऱ्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय करायलाही त्या विसरत नाहीत. आजपर्यंत अशा असंख्य आणि अनोळखी रुग्णांसाठी त्यांनी अन्नपूर्णा बनून काम केले आहे. मुख्य म्हणजे रुग्णांसाठी आपण काहीतरी वेगळे करत आहोत, त्यांच्यावर उपकार करत आहोत असे भासू नये म्हणून त्या रुग्णांशी मुद्दाम संवाद साधत नाहीत की ओळखही करून घेत नाहीत. त्यांच्या या सेवेची आवड बघून काही डॉक्टर किंवा नर्स त्यांना स्वतःहून गरजू रुग्णांची माहिती कळवतात आणि त्या डबे देण्यास सुरुवात करतात.

            याबाबत त्या म्हणाल्या की, ' बऱ्याचदा रुग्णालय परिसरात कमी तिखट, तेलकट आणि स्वच्छ वातावरणात बनवलेले जेवण मिळतेच असं नाही. मुलगा आजारी असताना जो त्रास आम्हाला झाला, तो इतरांना होऊ नये या भावनेतून मी डबे देते. आता तर माझ्या लहान मुलीसुद्धा एखादे रुग्णालय दिसल्यावर 'आई, कोणी रुग्ण आहे का, चल बघूया' असं म्हणतात. ज्याला गमवायचे होते तो त्या मुलाला त्यांनी गमावले आहेच पण त्यातून बाहेर पडून इतरांच्या आयुष्यात अन्नपूर्णा बनून निरपेक्ष भावनेने जाणाऱ्या विद्या यांचे काम दखल घ्यावे असेच आहे. 

तो प्रसंग मनावर कोरलेला 

विद्या यांचा मुलगा फक्त आई दूध पिण्याइतका लहान असताना त्यांना एकदा रुग्णालयाजवळ खाण्यायोग्य जेवण मिळत नव्हते. त्याचे पती बाहेर जेवण शोधत असताना मुलाने मात्र भुकेने रडायला सुरुवात केली. त्याच्या बाजूला असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवण झाल्यावर त्यांनी संकोचून उरलेले जेवण त्यांना देवू केले. त्यावेळी कुठलाही विचार न करता त्यांनी जेवण केले. त्या एका प्रसंगाने रूग्णासाठी जेवणाचे महत्व पटल्याचे त्या सांगतात. 

टॅग्स :PuneपुणेWorld Food Dayजागतिक अन्न दिवसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsocial workerसमाजसेवक