अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले होणार

By Admin | Updated: January 19, 2015 04:03 IST2015-01-19T04:03:26+5:302015-01-19T04:03:26+5:30

एका संकेतस्थळाद्वारे सोमवारी अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू होणार आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.

The world of blind websites will be open today | अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले होणार

अंधांच्या संकेतस्थळाचे जग आज खुले होणार

चंद्रकांत कित्तुरे, कोल्हापूर
एका संकेतस्थळाद्वारे सोमवारी अंधांसाठी बे्रलवाणी एज्युकेशन रेडिओ केंद्र सुरू होणार आहे. भारत, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियात एकाचवेळी ६६६.स्रांु.्रल्ल या संकेतस्थळाचे उद्घाटन केले जाणार आहे. या माध्यमातून अंधासाठी एक नवे जग खुले होणार आहे.
अंधशिक्षण संशोधक सतीश नवले यांच्या ध्यासातून आणि पुण्यातील प्रेरणा असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. सतीश नवले हे मुळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरेचे असून सध्या कोल्हापुरात राहात आहेत. मात्र, कम्युनिटी रेडिओ चालविणारा देशातील पहिला अंध ठरण्याचा बहुमान सतीश यांनी मिळविला आहे.
याबाबत माहिती देताना नवले म्हणाले की, कोल्हापूर, पुणे, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी सकाळी १० वाजता या संकेतस्थळाचे एकाचवेळी उद्घाटन केले जाणार आहे. हे संकेतस्थळ डॉ. डी. वाय. पाटील. इंजिनिअरिंग कॉलेजच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. त्याला कोल्हापुरातील मनोरमा इन्फोटेकचे तांत्रिक सहकार्य लाभले असल्याचेही नवले यांनी सांगितले.
हे संकेतस्थळ सुरू करण्यामागे अंधांसाठी जनजागृती अभियान, समाजात नेत्रदानाचा प्रसार करणे, अंधांसाठी सॉफ्टवेअर तयार करणे, अंधांसाठी आॅनलाईन शिक्षण देणे हे उद्देश आहेत. कम्युनिटी रेडिओ केंद्रासाठीचे हे पहिले पाऊल आहे. रेडिओ केंद्र येत्या एप्रिलमध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचेही नवले यांनी सांगितले.

Web Title: The world of blind websites will be open today