कार्यकर्त्यांनी उन्हाची काळजी घ्यावी; रोहित पवारांच्या थेट रुग्णालयातून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 10:04 AM2019-04-07T10:04:06+5:302019-04-07T10:06:43+5:30

उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून अशा उन्हात नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील काळजी घ्यावी, असा सल्ला शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दिला.

Workers should take care of the summer; Suggestions from Rohit Pawar Hospital | कार्यकर्त्यांनी उन्हाची काळजी घ्यावी; रोहित पवारांच्या थेट रुग्णालयातून सूचना

कार्यकर्त्यांनी उन्हाची काळजी घ्यावी; रोहित पवारांच्या थेट रुग्णालयातून सूचना

Next

मुंबई – लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पुढाऱ्यांसह कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत उन्हात फिरत आहेत. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून अशा उन्हात नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देखील काळजी घ्यावी, असा सल्ला शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दिला. आजारी असल्यामुळे रोहित पवार सध्या रुग्णालयात दाखल आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस हडपसर येथील रुग्णालयात अॅडमीट व्हावं लागलं. ऑपरेशन करावे लागले. या काळात पक्षाचे कार्यकर्ते, मित्र हितचिंतक यांनी काळजीतून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अनेकांना उत्तर देता आली नाहीत. हॉस्पीटलचे डॉक्टर, नर्सेस यांनी अहोरात्र काळजी घेतल्याने मी आता पूर्णपणे बरा असून पुन्हा त्याच जोशाने प्रचारास सुरवात करत आहे.

माझी आपणा सर्वांनी हिच विनंती आहे की, आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात. वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे फक्त त्याचसोबत आपली तब्येत तितकीच जपणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार.

 

 

Web Title: Workers should take care of the summer; Suggestions from Rohit Pawar Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.